TRENDING:

HSRP Number Plat लावण्याची शेवटची तारीख काय, किती भरावा लागणार दंड?

Last Updated:
HSRP नंबर प्लेट न लावल्यास १८ दिवसांत अर्ज करा, अन्यथा १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. महाराष्ट्रात तपासणी सुरू असून सुरक्षा आणि नियमांसाठी ही प्लेट आवश्यक आहे.
advertisement
1/7
HSRP Number Plat लावण्याची शेवटची तारीख काय, किती भरावा लागणार दंड?
तुम्ही गाडीला नवीन नंबर प्लेट बसवून घेतली का? नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमच्याकडे फक्त १८ दिवस शिल्लक राहिले आहेत. HSRP नंबर प्लेट जर तुम्ही लावली नसेल तर आताच अर्ज करून घ्या, नाहीतर तुम्हाला भलामोठा दंड भरावा लागू शकतो.
advertisement
2/7
तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे, आणि जर तुम्ही ही प्लेट लावली नसेल, तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. अनेक महिन्यांपासून सरकारने या हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, डेडलाइन उलटूनही अनेक वाहनचालकांनी या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता केवळ दंड नाही, तर भविष्यात तुमच्या वाहनावर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
3/7
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने त्यांच्या सोयीनुसार आणि नियमनानुसार वेगवेगळ्या अंतिम तारखा निश्चित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट अंतिम तारीख घोषित नसली तरी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आणि वाहतूक पोलिसांकडून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर तपासणी सुरू आहे.
advertisement
4/7
नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंड आकारला जातो. हा दंड साधारणपणे १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.ॉ दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी दंड आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही लवकरच या नियमांची कठोर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. दंड टाळायचा असेल, तर आता तातडीने ही प्लेट बसवून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
5/7
आपल्या सर्वांना माहीत आहे की, प्रत्येक सरकारी कामात काहीतरी अडचण येतेच. अनेक वाहनधारकांना ही प्लेट बसवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात अडचणी आल्या, तर काही ठिकाणी प्लेट मिळायला अवाजवी उशीर होत आहे.
advertisement
6/7
एका बाजूला लाखो रुपये खर्च करून गाडी घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला फक्त एका प्लेटसाठी १०,००० चा दंड भरावा लागणार, ही चिंता अनेकांना सतावत आहे.तुम्ही कुठेही प्रवास करत असाल, तरी तुमच्या गाडीची ओळख सुरक्षित असणे आवश्यक आहे. ही HSRP प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
advertisement
7/7
या प्लेटवर एक युनिक लेझर कोड असतो, ज्यामुळे वाहन चोरी झाल्यास ते शोधणे सोपे होते आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा वापर झाल्यास ते ओळखता येते. त्यामुळे, ही प्लेट केवळ दंड टाळण्यासाठी नाही, तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
HSRP Number Plat लावण्याची शेवटची तारीख काय, किती भरावा लागणार दंड?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल