TRENDING:

IIT मधून शिक्षण, नंतर तब्बल 84 लाख रुपयांची नोकरी सोडली, कारण..., अत्यंत अनोखी कहाणी

Last Updated:
तुम्ही अशी अनेक लोकं पाहिली असतील, ज्यांनी मोठी गुंतवणूक करुन व्यवसाय केले. मात्र, आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत, ज्यांनी लाँड्रीचा व्यवसाय करुन 170 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/5
IIT मधून शिक्षण, नंतर तब्बल 84 लाख रुपयांची नोकरी सोडली.., अनोखी कहाणी
ही कहाणी आहे जमदेशपूर याठिकाणी जन्म झालेल्या अरुणाभ सिन्हा यांची. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. त्यांचे वडील शिक्षक होते. तर आई गृहिणी. अरुणाभ हे बालपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांच्या कुटुंबीची आर्थिक परिस्थिती खराब होती. मात्र, तरी त्यांच्या आईने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवायचे असा निर्णय घेतला होता. माझ्या मनातही होते की, माझ्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे आहे.
advertisement
2/5
अरुणाभ सांगतात की, यानंतर त्यांच्या आईने लग्नाच्या बांगड्या विकून अरुणाभ यांना IIT बॉम्बे येथपर्यंत पोहोचवले. यानंतर अरुणाभ यांनी आयआयटी बॉम्बे येथून इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजीनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 3 कंपन्यांमध्ये नोकरी केली. त्यांनी 2014 मध्ये आपला पहिला स्टार्टअप फ्रँक ग्लोबल या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली.
advertisement
3/5
जेव्हा कंपनी चांगली चालू लागली तेव्हा त्यांनी ती कंपनी विकून टाकली. त्यांनंतर त्यांनी ट्रिबो होटल्‍समध्ये मोठ्या पदावर नोकरी लागली. याठिकाणी त्यांचे वार्षिक पॅकेज हे 84 लाख रुपये इतके होते. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी पाहिले की, बजेट हॉटेलमध्ये ग्राहकाला सर्वात जास्त त्रास हा उशी, चादर, ब्लँकेट, टॉवेल याच्या अस्वच्छतेमुळे होते. ही परिस्थिती सलून आणि रेस्टॉरंटमध्येही होते. त्यांना चांगली कपडे धुण्याची सेवा मिळू शकत नाही, यामुळे हॉटेलसह इतर इंडस्ट्रीच्या लोकांनाही त्रास होत होता.
advertisement
4/5
अरुणाभ म्हणाले की, जेव्हा मी पाहिले की, इंटरनेटच्या काळातही आज हे एक असंघटित क्षेत्र आहे. मात्र, यामध्ये कोट्यवधींचा व्यवसाय अडकलेला आहे. यानंतर जवळपास 15 महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि 2017 मध्ये U Clean कंपनीची सुरुवात केली. वसंत कुंजमध्ये त्यांनी आपले पहिले स्टोअर सुरू केले. 20 लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी या कंपनीची सुरुवात केली.
advertisement
5/5
आजपर्यंत त्यांच्या कंपनीने 170 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. वेळोवेळी त्यांना गुंतवणूकदारांची साथ मिळाली. आतापर्यंत कंपनीने 6 कोटी रुपयांचा फंड जमा केला आहे. कंपनीचे 154 शहरांमध्ये 525 पेक्षा जास्त फ्रँचाइजी आहेत. आता कंपनीची नजर आंतरराष्ट्रीय बाजारावर आहे, असे ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
IIT मधून शिक्षण, नंतर तब्बल 84 लाख रुपयांची नोकरी सोडली, कारण..., अत्यंत अनोखी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल