फक्त 72,000 हजार लावा आणि 2,11,79,483 रुपये मिळवा, SIP ची मॅजिक स्कीम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नियमितपणे गुंतवणूक केल्यास 15 वर्षांच्या कालावधीत व्याजासह तुम्हाला 19 लाख 52 हजार 740 रुपये मिळतील.
advertisement
1/9

योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की, विनाकारण खर्च होणारे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर तुमचं बचत करण्याचं ध्येय वेळेवर साध्य होईल.
advertisement
2/9
आर्थिक गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये अनेक पारंपरिक आणि थोडीफार जोखीम असलेले पर्याय उपलब्ध आहेत. जोखीम असलेल्या पर्यायांमुळे दीर्घकाळात चांगला परतावा मिळतो. जर फायनान्शिअल प्लॅनरचं म्हणणं ऐकलं तर तुम्ही, कोट्यधीश होऊ शकता.
advertisement
3/9
फायनान्शिअल प्लॅनरनुसार, दररोज 200 रुपये याप्रमाणे एका वर्षाचे 72 हजार रुपये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवले तर कोट्यवधी रुपयांचा फायदा होऊ शकतो. एक कॉन्झर्वेटिव इन्व्हेस्टर आपले पैसे पीपीएफसारख्या सरकारी हमी असलेल्या योजनांमध्ये गुंतवतो. पीपीएफमध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम ही करमुक्त असते. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे.
advertisement
4/9
तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा सहा हजार रुपये गुंतवल्यास वर्षभरातील गुंतवणूक 72 हजार रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास 15 वर्षांच्या कालावधीत व्याजासह तुम्हाला 19 लाख 52 हजार 740 रुपये मिळतील.
advertisement
5/9
पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी किमान 15 वर्षांचा आहे. पीपीएफमध्ये जर 20 वर्षांसाठी प्रति महिना सहा हजार रुपये जमा केल्यास गुंतवणूक आणि व्याजाची एकूण रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल.
advertisement
6/9
गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षे वाढवला तर तुम्हाला 49 लाख 47 हजार 847 रुपये मिळतील. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पीपीएफ ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. पण, तीचे व्याज दर तीन महिन्यांनी बदलतात.
advertisement
7/9
तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये प्रतिमहिना सहा हजार रुपयेप्रमाणे 25 वर्षे गुंतवणूक केली आणि व्याजदर 10 टक्के असेल तर तुम्हाला 80 लाख 27 हजार 342 रुपये मिळतील. गुंतवणूक कालावधी 30 वर्षांचा असेल तर तुम्हाला 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये मिळतील.
advertisement
8/9
तज्ज्ञांच्या मते, 10 टक्के रिटर्न अतिशय सामान्य आणि कंझर्वेटिव आहे. तर डायव्हर्सिफाइड फंडांमध्ये 12 टक्के रिटर्न मिळणं सामान्य बाब आहे. या दरानुसार 25 वर्षांत तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये मिळतील.
advertisement
9/9
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहिती आणि ब्रोकरेजच्या मतावर आधारीत आहे. . कोणतंही नुकसान किंवा फसवणूक झाल्यास न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. गुंतवणुकीआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)