इराण युद्धाची झळ, खाद्यतेलाच्या किमतीत 13 रुपयांची वाढ; तुमच्या घरचं तेल किती रुपयांना मिळणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
तुमच्या घरात तुम्ही कोणतं तेल वापरता, सूर्यफूल, शेंगदाणा की पाम तेल? तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे, आता फोडणी महाग होणार आहे, तेल कमी वापरावं लागणार आहे.
advertisement
1/6

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता थेट सामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका बसून गॅस सिलिंडर महागल्यानंतर, आता खाद्यतेलाच्या किमतींनीही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं.
advertisement
2/6
गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात सरासरी १३ रुपयांची वाढ झाली असून, महागाईचा हा नवा 'तडका' गृहिणींचे बजेट कोलमडवणारा ठरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं आणि वाहतूक खर्च वाढल्याने तेलाचे भाव गगनाला भिडले.
advertisement
3/6
फेब्रुवारीपर्यंत १६० रुपये किलो असणारं सूर्यफूल तेल आता थेट १७८ रुपयांवर पोहोचले. सोयाबीन तेलासाठीही आता १५९.३२ रुपये मोजावे लागत आहेत. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलाने २०० चा आकडा ओलांडून २०४ रुपयांचा टप्पा गाठला.
advertisement
4/6
तर शेंगदाणा तेल १९४ रुपयांच्या घरात गेले आहे. गरीबांचे तेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम तेलानेही १४८ रुपयांची पातळी गाठली आहे. या युद्धाचा परिणाम केवळ महागाईवरच झालेला नाही, तर शेती अर्थव्यवस्थेलाही मोठा तडा बसला आहे. निर्यात बंद झाल्याने अनेक शेतमालाचे दर स्थानिक बाजारपेठेत घसरले.
advertisement
5/6
एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे आणि दुसरीकडे त्याच शेतकऱ्याला विकतच्या वस्तू मात्र महागड्या दराने घ्याव्या लागत आहेत. याव्यतिरिक्त कमर्शियल गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत आला आहे.
advertisement
6/6
एकूणच, इराण-इस्रायल वादाची ठिणगी जोपर्यंत शमत नाही, तोपर्यंत जागतिक पुरवठा साखळी अशीच विस्कळीत राहण्याची भीती आहे. अशा स्थितीत महागाईचा हा आलेख आगामी काळात आणखी वर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
इराण युद्धाची झळ, खाद्यतेलाच्या किमतीत 13 रुपयांची वाढ; तुमच्या घरचं तेल किती रुपयांना मिळणार?