TRENDING:

फक्त 5 हजारांची गुंतवणूक, आता 50 लाखांची उलाढाल, एक गृहिणी कशी झाली मालामाल?

Last Updated:
घरासाठी म्हणून त्यांनी शेतातून आणलेल्या मिरची पासून मिरची पावडर बनवली आणि तेथूनच त्यांच्या सामान्य गृहिणी ते मसाला उद्योजक अशा नव्या प्रवासाला सुरुवात झाली. सामान्य ते गृहिणी एक मसाला व्यवसायिक होण्यापर्यंतचा मीनल यांचा प्रवास कसा झाला हे आम्ही थेट त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
1/7
फक्त 5 हजारांची गुंतवणूक, आता 50 लाखांची उलाढाल, एक गृहिणी कशी झाली मालामाल?
कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लोकडाऊनने अनेकांच्या अर्थकारणाची चाके थांबवली. मात्र या संकटाच्या काळातही अनेकांनी व्यवसायाच्या नव्या संधी शोधल्या. त्यापैकीच एक आहेत जालन्यातील महिला उद्योजक मीनल जैद.
advertisement
2/7
घरासाठी म्हणून त्यांनी शेतातून आणलेल्या मिरची पासून मिरची पावडर बनवली आणि तेथूनच त्यांच्या सामान्य गृहिणी ते मसाला उद्योजक अशा नव्या प्रवासाला सुरुवात झाली. सामान्य ते गृहिणी एक मसाला व्यवसायिक होण्यापर्यंतचा मीनल यांचा प्रवास कसा झाला हे आम्ही थेट त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
3/7
जालना शहरातील प्रयागनगर भागात मीनल परिवारा सहित राहतात. त्यांचे पती हे सूक्ष्म सिंचनाच्या व्यवसायात आहेत. कोरोना लॉकडाऊन दरम्यान अनेक जण गावी जाऊन राहण्यास प्राधान्य देत होते. तेव्हा जैद कुटुंब देखील काही दिवसांसाठी गावाकडे गेलं. तेव्हा शेतामध्ये मिरचीची लागवड केलेली होती. लॉकडाऊन असल्याने मिरचीला अत्यल्प दर मिळत होता. म्हणून त्या काही मिरची पावडर करण्यासाठी म्हणून जालन्यात घेऊन आल्या.
advertisement
4/7
या मिरची पासून पावडर तयार केल्यानंतर त्यांच्या मैत्रिणींना थेट शेतातील मिरची पासून बनवलेली ही मिरची पावडर अतिशय आवडली. यानंतर त्यांनी आणखी काही किलो मिरच्या गावाकडून आणल्या आणि जवळपास एक क्विंटल मिरची पावडर बनवली. एकाच दिवसात या मिरची पावडरची विक्री करण्यात त्या यशस्वी झाल्या. एका दिवसात एक क्विंटल मिरची पावडरची विक्री होऊ शकते तर आपण याकडे व्यवसायिक दृष्ट्या का बघू शकत नाही असा विचार त्यांच्या मनात आला आणि तेथूनच त्यांच्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात झाली.
advertisement
5/7
सुरुवातीला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना 5 हजार रुपये खर्च आला. आता संपूर्ण राज्यात त्यांच्या मसाल्याची विक्री होते. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा सर्व महत्त्वाच्या शहरात जालना मसाला पोचला आहे. सुरुवातीला हळद आणि मिरची पावडर पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मटन मसाला अशा मसाल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारापर्यंत आला आहे.
advertisement
6/7
या व्यवसायातून मीनल आणि त्यांच्या कुटुंबाची व्यवसायिक भरभराट तर होत आहे. त्याचबरोबर 18 होतकरू महिलांना रोजगार मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या मिरची आणि हळद यासारख्या पिकांना चांगला दर देखील मिळतोय. पती आणि कुटुंबाची साथ मिळाली तर सर्वसामान्य गृहिणी देखील स्वतःची व्यवसायिक वाट निर्माण करू शकते हेच मीनल जैद यांनी सिद्ध करून दाखवले त्यांची ही कहाणी इतर सामान्य गृहिणींना देखील प्रेरणादायी आहे.
advertisement
7/7
सध्या माझ्याकडे 18 महिला काम करतात तर जवळपास पंधराशे एकर शेतजमिनीवरील हळद आणि मिरची शेतकऱ्यांकडून करार करून घेतली आहे. वर्षाकाठी जवळपास 50 लाखांचा टन ओव्हर आहे तर यातून 15 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचं मीनल जैद यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
फक्त 5 हजारांची गुंतवणूक, आता 50 लाखांची उलाढाल, एक गृहिणी कशी झाली मालामाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल