TRENDING:

LPG सिलेंडरच्या नियमात बदल! केंद्र सरकारच्या निर्णयांचा तुमच्यावर काय होईल परिणाम?

Last Updated:
LPG cylinder new rules: देशभरात एलपीजी सिलेंडर हा चर्चेचा विषय बनला आहे. एलपीजी तुटवड्याविषयी देशभरात भितीचं वातावरण आहे. दरम्यान सरकारने एलपीजीविषयी नवे नियम लागू केले आहेत.
advertisement
1/7
LPG सिलेंडरच्या नियमात बदल! केंद्र सरकारच्या निर्णयांचा तुमच्यावर काय होईल परिणाम?
LPG cylinder new rules: जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. ज्यामुळे विविध देशांमधील आयात-निर्यातीवर परिणाम झालाय. यातील एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे एलपीजी आणि तेलाच्या आयातीवर झालेला परिणआम आहे. हे पाहता आता केंद्र सरकारने काही कठोर नियम केले आहेत. आता या नियमांचा तुमच्यावर काय परिणाम होणार हे पाहूया.
advertisement
2/7
सरकार म्हणते की, जागतिक परिस्थिती आणि आयातवरील आपलं अवलंबित्व पाहता ऊर्जा संसाधनाचा संतुलित उपयोग करणं गरजेचं आहे. याच कारणामुळे एलपीचीच्या किंमती, बुकिंग नियम आणि पुरवठा व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत.
advertisement
3/7
घरगुती वापराचे सिलेंडर झाले महाग : केंद्र सरकारने गेल्या 7 मार्च रोजी घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीची सिलेंडरच्या किंमतींमध्ये जवळपास 7% वाढ केली आहे. या वाढीनंतर 14.2 किलोचे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जवळपास 965 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू शकते. मात्र उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रति 14.2 किलो सिलेंडरवर 300 रुपये थेट सब्सिडी त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होते. म्हणजेच सिलेंडरची किंमत त्यांना सुमारे 550 रुपये लागते.
advertisement
4/7
सरकारने गॅस सिलेंडर बुक करण्याच्या पद्धतीमध्येही मोठा बदल : नव्या नियमानुसार, आता तुम्ही एक सिलेंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरं सिलेंडर बुक करू शकत नाही. दोन्ही बुकिंगमध्ये एक ठरलेला वेळेचा गॅप ठेवणे गरजेचे आहे. पहिले 25 दिवसांनंतर तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकत होता. आता हा कालावधी वाढवून 45 दिवस केला आहे. ग्रामिण आणि दुर्गम भागात हा नियम केलाय. मात्र शहरी भागात 25 दिवसाचा नियम जारी आहे. एक कुटुंब वर्षातून 15 सिलेंडर बुक करू शकते. ज्यामधून 12 सब्सिडाइज्ड आहेत. घरात कायदेशीररित्या 2 सिलेंडर ठेवले जाऊ शकतात.
advertisement
5/7
पाइप लाइनने गॅस वापरणाऱ्यांसाठी कठोर नियम : तुमच्या घरी पाइप लाइनने गॅस येत असेल म्हणजे PNG (पाइप्ड नॅचुरल गॅस) कनेक्शन असेल तर तुम्ही घरात LPG सिलेंडर ठेवू शकत नाही. यावर बंदी घातली आहे.सरकारने स्पष्ट केलंय की, जे पाइपलाइनचा गॅस वापरतात त्यांना नवा सिलेंडर कनेक्शन देऊ नये, तसंच जुनं सिलेंडरही भरून देऊ नये. अशा लोकांनी स्वतः एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे असंही सरकारने सांगितलंय.
advertisement
6/7
हे का होतंय? : या सर्वांचं कारण म्हणजे ऊर्जा संकट आहे. कारण भारत आपल्या गरजेच्या जवळपास 90% टक्के LPG गॅस दुसऱ्या देशांतून खरेदी करते. ईराण-इस्रायलमध्ये तणाव सुरू आहे. ज्यामुळे आयात करण्यात अडचणी येत आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, जी पूर्वी मध्य पूर्वेतून आपल्याला गॅस पुरवत होती, परंतु आता हे प्रमाण खुपच कमी झालेय.
advertisement
7/7
सरकार शांत बसलेले नाही. यावर उपाययोजना सुरू आहेत. अडचणी दूर करण्यासाठी मार्ग शोधले जाताय. सरकार आता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया सारख्या देशांकडून खरेदीचा प्रयत्न करतेय. यासह देशात उपलब्ध रिफायनरीमध्येही गॅसचं उत्पादन जवळपास 28% पर्यंत वाढवण्याची तयारी सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG सिलेंडरच्या नियमात बदल! केंद्र सरकारच्या निर्णयांचा तुमच्यावर काय होईल परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल