LPG Gas price: 5 रुपयांनी स्वस्त झाला LPG गॅस सिलिंडर, तुम्हाला किती रुपयांना मिळणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
LPG Gas price: 5 रुपयांनी स्वस्त झाला LPG गॅस सिलिंडर, मुंबईपासून दिल्लीपर्यंत एका क्लिकवर पाहा नवे दर
advertisement
1/5

1 नोव्हेंबर आजचा दिवस खास आहे. याचं कारण म्हणजे व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात दरवाढ झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी ही कपात झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
2/5
मुंबईमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरचे दर १,५४७ रुपये होते. आता नोव्हेंबरमध्ये १,५४२ रुपये नवे दर लागू होणार आहेत. 5 रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाला आहे. दिल्लीमध्ये देखील 5 रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाला आहे. ऑक्टोबरमध्ये १,५९५ दर होते, नोव्हेंबरमध्ये १,५९० रुपये नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.
advertisement
3/5
कोलकाता इथे व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १,७०० रुपये ऑक्टोबर महिन्यात होते. आता नोव्हेंबर महिन्यात १,६९४ रुपये नवे दर झाले आहेत. कोलकातामध्ये 6.50 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. चेन्नईमध्ये १,७५४.५० रुपये दर ऑक्टोबर महिन्यात होते. आता नोव्हेंबरमध्ये १,७५०.०० रुपये नवे दर लागू झाले आहेत. चेन्नईमध्ये ४.५०रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.
advertisement
4/5
सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशभरातील बहुतेक शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ८५० रुपये ते ९६० दरम्यान आहे. सध्या, दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८५३ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये, लखनऊमध्ये ८९०.५० रुपये, अहमदाबादमध्ये ८६० रुपये, हैदराबादमध्ये ९०५ रुपये, वाराणसीमध्ये ९१६.५० रुपये आणि पटनामध्ये ९५१ रुपयांमध्ये मिळत आहे.
advertisement
5/5
सरकारने १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर काही प्रमाणात सवलत दिली आहे, त्यांच्या किमतीत पाच रुपयांची कपात केली आहे. १४ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरची किंमत कायम आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मागच्या काही महिन्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG Gas price: 5 रुपयांनी स्वस्त झाला LPG गॅस सिलिंडर, तुम्हाला किती रुपयांना मिळणार?