नव्या वर्षात खिशाला चटका, 111 रुपयांनी महाग झाला गॅस सिलिंडर, तुम्हाला किती रुपयांना मिळणार चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
LPG च्या १९ किलो कर्मशियल सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची वाढ झाली असून, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये हे नवे दर लागू झाले आहेत. घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
advertisement
1/6

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चटका लावणारी बातमी आहे. LPG च्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ मागच्या काही महिन्यांच्या तुलनेत मोठी आहे. २०२६ या नवीन वर्षाचा आनंद साजरा होत असतानाच, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला आहे.
advertisement
2/6
१ जानेवारी २०२६ पासून १९ किलोच्या कर्मशिएल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल १११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. कर्मशियल गॅस सिलिंडर 19 किलोचे दर वाढल्याने त्याचा हॉटेल इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे.
advertisement
3/6
दिल्लीमध्ये १५८०.५० रुपयांचा सिलिंडर आता १६९१.५० रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईमध्ये १५३१.५० रुपयांऐवजी आता १६४२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकाता इथे १६८४ रुपयांवरून किंमत आता १७९५ रुपयांवर पोहोचली आहे. तर चेन्नईत १७३९.५० रुपयांचा सिलिंडर आता १८४९.५० रुपयांना मिळेल.
advertisement
4/6
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर अद्यापही एप्रिल महिन्यापासून स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती सिलिंडर ८५३ रुपये, तर मुंबईत ८५२ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे गृहिणींना या दरवाढीतून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
advertisement
5/6
विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सलग कपात केली जात होती. १ डिसेंबर २०२५ रोजी किमतीत १० ते ११ रुपयांची घट झाली होती, तर नोव्हेंबरमध्येही दर कमी झाले होते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी १११ रुपयांची मोठी वाढ केल्याने व्यावसायिक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
advertisement
6/6
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायात केला जातो. एकाच वेळी १११ रुपयांची वाढ झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे बजेट कोलमडणार असून, याचा परिणाम म्हणून बाहेरचे जेवण आणि नाश्त्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नव्या वर्षात खिशाला चटका, 111 रुपयांनी महाग झाला गॅस सिलिंडर, तुम्हाला किती रुपयांना मिळणार चेक करा