TRENDING:

FasTag Annual Pass 3000 रुपयांचा FasTag पास घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NHAI कडून मोठी घोषणा

Last Updated:
NHAI ने टोल प्लाझावर Fastag वार्षिक पासची माहिती स्पष्टपणे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, पारदर्शकता वाढवण्यासाठी 'राजमार्गयात्रा' ॲपवरही माहिती उपलब्ध होईल.
advertisement
1/7
3000 रुपयांचा FasTag पास घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NHAI कडून मोठी घोषणा
ज्यांच्याकडे Fastag पास आहे किंवा जे काढण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी ही कामाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये वार्षिक पासची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर दिलासा देणारी बातमी आहे.
advertisement
2/7
३,००० किमतीच्या ॲन्यूअल फास्टॅग पास बाबतची माहिती आता टोल प्लाझावर ठळकपणे दाखवली जाणार आहे. या निर्णयामुळे महामार्ग वापरकर्त्यांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि त्यांना त्यांच्या पासबद्दलची अचूक माहिती मिळेल.
advertisement
3/7
एनएचएआयने राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी टोल प्लाझावर मासिक आणि वार्षिक पासची माहिती दर्शविण्याची घोषणा केली आहे. या माहितीचे प्रदर्शन करण्यामागचा मुख्य उद्देश पारदर्शकता वाढवणे आणि महामार्ग वापरकर्त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे हा आहे.
advertisement
4/7
एनएचएआयने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना यासंबंधीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व टोल प्लाझावर ही माहिती स्वच्छ आणि प्रमुखपणे प्रदर्शित केली जावी. यामुळे, जेव्हा तुम्ही टोल क्रॉस कराल, तेव्हा डिस्प्लेवर तुमच्या पासच्या किती फेऱ्या बाकी आहेत आणि त्याची वैधता कधीपर्यंत आहे, याची माहिती तुम्हाला तात्काळ मिळेल.
advertisement
5/7
मासिक आणि वार्षिक पासची ही माहिती टोल प्लाझाच्या जवळ असलेल्या ग्राहक सेवा क्षेत्रात तसेच प्रवेश/निर्गमन पॉईंट्सवरील साइनेजवरही दाखवली जाईल. एनएचएआयने या सर्व टोल प्लाझावर हे साइनेज बोर्ड पुढील ३० दिवसांच्या आत लावण्याचे आदेश दिले आहेत. हे बोर्ड हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेमध्ये असतील आणि ते दिवस-रात्र स्पष्टपणे दिसावेत, अशा पद्धतीने लावले जातील.
advertisement
6/7
या वार्षिक पाससंबंधीची माहिती अधिक व्यापक करण्यासाठी, एनएचएआय ही माहिती 'राजमार्गयात्रा' मोबाईल ॲप आणि संबंधित प्रोजेक्ट वेबसाइटवरही अपलोड करणार आहे. वार्षिक पास हा हा पास कार, जीप किंवा व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठी आहे. 3000 रुपयांमध्ये हा पास काढता येतो. हा पास एक वर्षासाठी किंवा २०० टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी वैध असतो. हा पास 'राजमार्गयात्रा ॲप' वरून ऑनलाइन खरेदी करता येतो.
advertisement
7/7
पास खरेदी केल्यानंतर तो तुमच्या कारच्या वैध फास्टॅगशी आपोआप जोडला जातो. हा पास देशभरातील सुमारे १,१५० टोल प्लाझावर काम करतो. हा पास घेण्यासाठी आधार कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो. टोल प्लाझाच्या हेल्पडेस्कवर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा पास मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी तो घेतला नाही त्यांनी नोंदणी करून लगेच घेऊन टाका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
FasTag Annual Pass 3000 रुपयांचा FasTag पास घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NHAI कडून मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल