TRENDING:

Success Story: बँकेतील नोकरीचा दिला राजीनामा, प्रणिता यांनी सुरू केला ब्रँड, महिन्याला 15 लाख कमाई

Last Updated:
प्रणिता या एका बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत होत्या. पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा देत फॅशन डिझाईनचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
1/7
बँकेतील नोकरीचा दिला राजीनामा, प्रणिता यांनी सुरू केला ब्रँड, 15 लाख कमाई
प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि स्वप्नांप्रती आत्मीयता असेल, तर एक ना एक दिवस आपली सगळी स्वप्नं पूर्ण होतात. हेच सिद्ध करून दाखवलंय पुण्यातील प्रणिता साळुंखे यांनी. प्रणिता या एका बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत होत्या पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.
advertisement
2/7
अखेर त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा देत फॅशन डिझाईनचा व्यवसाय सुरू केला. आज त्या या क्षेत्रातून लाखोंची कमाई करत आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
3/7
फॅशनची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या जोरावर पुण्यातील प्रणिता साळुंखे यांनी 2016 मध्ये आर्मर बिस्पोक या लक्झरी मेंसवेअर ब्रँडची स्थापना केली. येथे पुरुषांसाठी खास कपडे डिझाईन केले जातात.
advertisement
4/7
पारंपरिक टेलरिंगची नजाकत आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम घडवून प्रणिता अशा पोशाखांची निर्मिती करतात. आणि विशेष म्हणजे त्या भारतातील पहिल्या आर्मर बिस्पोक डिझाईन करणाऱ्या महिला आहेत.
advertisement
5/7
लहानशा लेबलमधून सुरुवात झालेला आर्मर बिस्पोक आज देश-विदेशातील व्यावसायिक, उद्योगपती आणि उद्योजकांपर्यंत पोहोचला आहे. लग्नसोहळ्यांसाठीचे पोशाख तयार करण्यापासून सुरुवात झालेल्या या ब्रँडने आता कॉर्पोरेट आणि फेस्टिव्ह कलेक्शनपर्यंत आपला विस्तार केला आहे. आज या व्यवसायातून महिन्याला तब्बल 10 ते 15 लाखांचे उत्पादन होत आहे.
advertisement
6/7
प्रणिता साळुंखे सांगतात, भारतातील पुरुषांच्या फॅशनमध्ये पर्याय अनेक असले तरी दर्जा, हातकलेचा स्पर्श आणि पर्सनलायझेशन फारच कमी ठिकाणी मिळतो. म्हणूनच मी लंडनमधील सॅव्हिल रो येथे जाऊन ब्रिटिश आणि इटालियन टेलरिंग शिकले. तीच कला पुण्यात आणली आणि आर्मर बिस्पोकची स्थापना केली.
advertisement
7/7
2016 साली पुण्यात सुरू झालेला आर्मर बिस्पोक हा लक्झरी मेंसवेअर ब्रँड आज सूट, टक्सेडो, बंदगला, शेरवानी आणि फ्युजन वियरसाठी ओळखला जातो. प्रत्येक पोशाख हँडक्राफ्टेड आणि मेड-टू-मेझर असतो, म्हणजेच ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैलीनुसार तो डिझाइन केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: बँकेतील नोकरीचा दिला राजीनामा, प्रणिता यांनी सुरू केला ब्रँड, महिन्याला 15 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल