TRENDING:

Women Success Story: पगारापेक्षा व्यवसायातून जास्त कमावले तेही महिन्याला, रश्मी यांनी अनेकांना दिला रोजगार!

Last Updated:
Business woman: लग्नाअगोदर रश्मी पुण्यात एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होत्या. लग्न झाल्यानंतर त्यांना पुणे सोडून नाशिकमध्ये यावं लागलं.
advertisement
1/7
पगारापेक्षा व्यवसायातून जास्त कमावले तेही महिन्याला, अनेकांना दिला रोजगार!
पूर्वीच्या काळी स्त्रियांचं विश्व फक्त 'चूल आणि मूला'पर्यंत मर्यादित होतं. मात्र, आजकालच्या स्त्रियांना फक्त घर-संसारात अडकून राहण्याची इच्छा नाही. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं आहे.
advertisement
2/7
यासाठी काहीजणी नोकरीचा पर्याय स्विकारतात तर काहीजणी स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. काही स्त्रिया तर अशा देखील आहेत ज्यांनी नोकरी सोडून व्यवसाय थाटला आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या रश्मी निघोसकर यांचा अशाच स्त्रियांमध्ये समावेश होतो. रश्मी यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यावासाय सुरू केला आहे. या व्यावसायाच्या माध्यमातून त्यांनी इतरांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
advertisement
3/7
लग्नाअगोदर रश्मी पुण्यात एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होत्या. लग्न झाल्यानंतर त्यांना पुणे सोडून नाशिकमध्ये यावं लागलं. नाशिकमध्ये आल्यानंतर नोकरीत त्यांना रस राहिला नाही.
advertisement
4/7
पण, नोकरी सोडली तर घरात बसून काय करणार हाही प्रश्न त्यांच्यासमोर होता. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी ज्वेलरी डिझाईन आणि ज्वेलरी मेकिंग शिकण्यास सुरवात केलं. नंतर त्यांनी घरीच ज्वेलरी बनवून विक्री सुरू केली.
advertisement
5/7
हळूहळू ज्वेलरीच्या व्यावसायला प्रतिसाद मिळू लागल्याने रश्मी यांनी इंदिरानगर भागात 'सखी कलेक्शन' या नावाने दुकान सुरू केलं. शिवाय त्यांनी इतरांचे क्लास घेण्यास देखील सुरुवात केली.
advertisement
6/7
आतापर्यंत त्यांनी असंख्य जणांना ज्वेलरी डिझाईन करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. रश्मी एवढ्यावरतीच शांत बसल्या नाहीत. त्यांनी ब्युटी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मेटिकची माहिती घेतली. विविध क्लासेस केले आणि योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःचे हर्बल साबण बनवले.
advertisement
7/7
कोरोना महामारीनंतर या नैसर्गिक साबणांना आणि ब्युटी प्रॉडक्ट्सला चांगलीच मागणी वाढली आहे, असं रेश्मा यांनी सांगितले. आपल्या व्यवसायच्या माध्यमातून रेश्मा महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांचं उत्पन मिळवत आहेत. इतकेच नाही तर साबण आणि बाकी वस्तूंची होलसेल दरात विक्री करून त्यांनी इतर महिलांनाही रोजगाराची संधी दिली आहे. तुम्हाला देखील त्यांच्या दुकानाला भेट देण्याची इच्छा असेल तर इंदिरानगर परिसरातील राधा वल्लभ संकुलात 3 क्रमांकाचं शॉप रश्मी यांचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Women Success Story: पगारापेक्षा व्यवसायातून जास्त कमावले तेही महिन्याला, रश्मी यांनी अनेकांना दिला रोजगार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल