10,000,000,000 संपत्ती, रतन टाटांनी 'लाडक्या टिटो'साठी केली खास तरतूद, मृत्यूपत्रात काय म्हटलंय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रतन टाटा यांनी मृत्यूपत्रात आपल्या लाडक्या श्वानासाठी खास तरतूद केली आहे. आपल्या पश्चात आपल्या प्रिय श्वानाला कोणताही त्रास होऊ नये याची व्यवस्थित काळजी त्यांनी मृत्यूपत्रातून घेतली आहे.
advertisement
1/7

उद्योगपती रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर उद्योगविश्वास एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना होती. रतन टाटा यांच्याकडे पाहिलं की साधी राहणीमान आणि उच्च विचार काय याची प्रचिती येते. त्यांच्या पश्चात जवळपास 10,000,000,000 रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीबाबत त्यांनी मृत्यूपत्रात महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
2/7
रतन टाटा यांनी मृत्यूपत्रात आपल्या लाडक्या श्वानासाठी खास तरतूद केली आहे. आपल्या पश्चात आपल्या प्रिय श्वानाला कोणताही त्रास होऊ नये याची व्यवस्थित काळजी त्यांनी मृत्यूपत्रातून घेतली आहे.
advertisement
3/7
मृत्यूपत्रामध्ये त्यांचा सर्वात लाडका श्वास टिटोचा उल्लेख केला आहे. टिटोची आयुष्यभर विशेष काळजी घेतली जाईल. याची जबाबदारी कुक राजन शॉ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
advertisement
4/7
टिटोच्या नावावर प्रत्यक्षात कोणतीही संपत्ती सोडल्याचा उल्लेख असल्याची तूर्तास कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र त्याची आयुष्यभर काळजी घ्यावी ही जबाबदारी कूक राजन शॉकडे असेल असा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
5/7
अलिबागमधील आलिशान बंगला, मुंबईतील जुहू तारा रोडवरील दोन मजली घर, 350 कोटींहून अधिक मुदत ठेवी आणि टाटा सन्समधील 0.83 टक्के हिस्सेदारी असा त्यांच्या संपत्तीचा भाग आहे.
advertisement
6/7
आपल्या संपत्तीमधील एक हिस्सा भाऊ जिमी टाटा, त्याच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जीजभॉय यांच्यासाठी असेल. उर्वरित मालमत्तेचा काही भाग टाटा कुटुंबातील परंपरेप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलंय.
advertisement
7/7
शांतनु नायडूचं कर्जही त्यांनी माफ केल्याचं आपल्या मृत्यूपत्रात उल्लेख केलाय. स्टार्टअप ‘Goodfellows’ मधील भागीदारी देखील संपुष्टात आणलीय विदेशात शिक्षणासाठी दिलेलं लोन देखील माफ केल्याचा उल्लेख मृत्यूपत्रात आहे. उर्वरित संपत्ती रतन टाटा एंडाउनमेंट फाउंडेशनच्या नावे ट्रान्सफर करावी असं मृत्यूपत्रात म्हटलंय
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
10,000,000,000 संपत्ती, रतन टाटांनी 'लाडक्या टिटो'साठी केली खास तरतूद, मृत्यूपत्रात काय म्हटलंय?