TRENDING:

Ratan Tata: घर ते ऑफिस रतन टाटा यांच्या साधेपणाचे 7 किस्से

Last Updated:
रतन टाटा यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं. त्यांनी कधीच बडेजाव केला नाही. घर ते ऑफिस त्यांच्या साधेपणाचे असे काही किस्से आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहेत.
advertisement
1/7
Ratan Tata:  घर ते ऑफिस रतन टाटा यांच्या साधेपणाचे 7 किस्से
रतन टाटा हे टाटा सन्सचे चेअरमन झाले तेव्हा ते जेआरडी टाटांच्या खोलीत बसले नाहीत. त्यांनी स्वत:साठी एक साधी आणि छोटीशी खोली तयार करून घेतली.तेच त्यांचं कार्यालय होतं.
advertisement
2/7
जेव्हा एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याशी बोलत असायचे, त्याचवेळेस जर एखादा वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आला. तर ते वरिष्ठ अधिकाऱ्याला वाट पाहायला सांगत असत.
advertisement
3/7
कोणताही बडेजाव नसलेली अतिशय साधी जीवनशैली, त्यांना कोणीही भेटू शकत होतं. कडे सचिव किंवा सहाय्यकांची गर्दी नव्हती. घरामध्ये नोकर-चाकरांचा थाट किंवा बडेजाव नव्हता.
advertisement
4/7
वेळेच्या शिस्तीसाठी ओळखले जात, सकाळी लवकर कार्यालयात पोहोचत. घरी ते एकांतात फाईल आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करायचे, वाचन करायचे.
advertisement
5/7
जमशेदपूरमध्ये 6 वर्षं होते. तिथे त्यांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवरील सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अॅप्रेंटिसशिप पूर्ण केली
advertisement
6/7
जिद्द हे यांच्या कुटुंबाचं स्वभाव वैशिष्ट्य होतं. लहानपणी जेव्हा त्यांना शाळेत रोल्स रॉईसमधून सोडलं जात असे तेव्हा ते अवघडून जायचे.
advertisement
7/7
त्यांचं कुत्र्यांवर खूप प्रेम होतं,त्यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड कुत्रे होते. एकाचं नाव 'टीटो' आणि दुसऱ्याचं 'टँगो'. हे दोन्ही कुत्रे त्यांचे फार लाडके होते. जेव्हा ते त्यांच्या बॉम्बे हाऊस कार्यालयात पोहोचयाचे तेव्हा रस्त्यावरील कुत्रे त्यांच्याभोवती गोळा होत असत
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ratan Tata: घर ते ऑफिस रतन टाटा यांच्या साधेपणाचे 7 किस्से
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल