TRENDING:

Silver Price Today: 4 तासात अचानक चांदीचे वधारले भाव, 2000 रुपयांनी महाग, 24 कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?

Last Updated:
चांदीच्या किंमतीत 3 नोव्हेंबर रोजी 2 हजार रुपयांची वाढ, दिल्ली 1,54,000 तर चेन्नई 1,68,000 रुपये. औद्योगिक वापर वाढल्याने भाव पुन्हा वाढू शकतात.
advertisement
1/7
4 तासात अचानक चांदीचे वधारले भाव, 2000 रुपयांनी महाग, 24 कॅरेटसाठी किती?
गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणीचा सामना करत असलेल्या चांदीच्या बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जवळपास पंधरा दिवसांपासून किंमतीत सुरू असलेली घट आज थांबली.
advertisement
2/7
दिल्लीच्या बाजारात चांदीचा भाव सध्या 1 लाख 54 हजार रुपयांवर, तर चेन्नईत 1 लाख 68 हजार रुपयांवर व्यवहारात आहे. दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली होती. मात्र आता तो उत्साह ओसरल्याने बाजारात मागणी थोडी कमी झाली आहे.
advertisement
3/7
गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये काहीशी घसरण झाली होती. तसंच, अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या आर्थिक चर्चेत काही प्रमाणात स्थिरता आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारही थोडा शांत झाला आहे.
advertisement
4/7
गुंतवणूकदार आता थोड्या काळासाठी इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. शेअर बाजार, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंड यांकडे वाढता कल असल्याने मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीचा वेग काहीसा कमी झाला आहे. तरीदेखील, आजची वाढ दाखवते की बाजार अजूनही पूर्णपणे मंदावलेला नाही.
advertisement
5/7
3 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत एक किलो चांदीचे दर 1,54,000 रुपये आहेत. तर दिल्लीमध्ये 1,54,000 रुपये, अहमदाबादमध्ये 1,54,000 रुपये, चेन्नईमध्ये 1,68,000 रुपये आहेत. सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक केलेल्यांनाही आज मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
दिल्ली आणि चेन्नईतील दरांमध्ये सुमारे 14 हजार रुपयांचा फरक आहे. यावरून देशभरातील मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेला फरक स्पष्टपणे दिसून येतो.पूर्वी चांदीचा वापर प्रामुख्याने दागिने आणि भांडी तयार करण्यासाठी होत असे. पण आता तिचा वापर तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
advertisement
7/7
मोबाईल, संगणक चिप्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सौरऊर्जा पॅनेलमध्ये चांदीचा वापर वाढत आहे. सध्या एकूण उत्पादनातील जवळपास 60 ते 70 टक्के चांदी औद्योगिक वापरासाठी जाते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत तिच्या किमती पुन्हा वाढू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Price Today: 4 तासात अचानक चांदीचे वधारले भाव, 2000 रुपयांनी महाग, 24 कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल