Gold Loan : सोन्यावर कर्ज घेताना बँका 'या' गोष्टी कधीच सांगत नाहीत, पण सर्वसामान्यांना माहित असणं गरजेचं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बँकेत गोल्ड लोनसाठी गेल्यानंतर अशा काही गोष्टी असतात ज्या बँका आपल्याला कधीच स्पष्टपणे सांगत नाहीत. जेव्हा आपण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही किंवा सोनं सोडवायला जातो, तेव्हा या लपलेल्या अटी समोर येतात आणि आपला खिसा रिकामा होतो.
advertisement
1/10

दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्याला पैशांची तातडीची गरज भासते. अशा वेळी घरात ठेवलेलं सोनं सर्वात मोठा आधार ठरतं. पर्सनल लोनसाठी बँकांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा किंवा सिबिल स्कोरची चिंता करण्यापेक्षा, 'गोल्ड लोन' घेणं हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग वाटतो. सोनं गहाण ठेवलं की लगेच हातात पैसे येतात, ही लोकांची धारणा आहे.
advertisement
2/10
पण, बँकेत गोल्ड लोनसाठी गेल्यानंतर अशा काही गोष्टी असतात ज्या बँका आपल्याला कधीच स्पष्टपणे सांगत नाहीत. जेव्हा आपण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही किंवा सोनं सोडवायला जातो, तेव्हा या लपलेल्या अटी समोर येतात आणि आपला खिसा रिकामा होतो. म्हणूनच, गोल्ड लोन घेण्यापूर्वी बँका कोणत्या गोष्टी गुपित ठेवतात किंवा आपल्याला सांगत नाहीत हे जाणून घेणं प्रत्येक सामान्य माणसासाठी गरजेचं आहे.
advertisement
3/10
आरबीआय (RBI) आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गोल्ड लोन घेताना खालील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात
advertisement
4/10
1. तुमचं 75% गणित आणि सोन्याचा भावआरबीआयच्या नियमानुसार, सोन्याच्या एकूण किमतीच्या केवळ 75% पर्यंतच कर्ज मिळू शकतं. पण बँका हे 75% आजच्या 'मार्केट रेट'वर नाही, तर गेल्या 30 दिवसांच्या सोन्याच्या सरासरी भावावर ठरवतात.जर सोन्याचा भाव आज अचानक वाढला असेल, तर तुम्हाला त्या वाढलेल्या भावाप्रमाणे पैसे मिळतीलच असं नाही. बँक सुरक्षिततेसाठी नेहमी कमीत कमी मूल्य धरते.
advertisement
5/10
2. सोन्याच्या शुद्धतेची 'गुपित' तपासणीजेव्हा तुम्ही दागिने गहाण ठेवता, तेव्हा बँक एका चांगल्या 'व्हॅल्युअर'कडून (Valuer) सोन्याची शुद्धता तपासाते.दागिन्यांमध्ये असलेले खडे, मोती किंवा कुंदन यांचं वजन सोन्यातून वजा केलं जातं. धक्कादायक म्हणजे, काही बँका 22 कॅरेटच्या दागिन्यांनाही 18 किंवा 20 कॅरेटच्या भावाने मोजतात, जेणेकरून त्यांना धोका कमी राहील. या तपासणीचे 'व्हॅल्युएशन चार्जेस' तुमच्याकडूनच वसूल केले जातात.
advertisement
6/10
3. लपलेले चार्जेसबँक तुम्हाला फक्त व्याजदराबाबत सांगते. पण प्रत्यक्षात अनेक छोटे छोटे खर्च तुमच्या कर्जाच्या रकमेतून कापले जातात किंवा व्याजात जोडले जातात. ते म्हणजे प्रोसेसिंग फी: 1% पर्यंत असू शकते, स्टॅम्प ड्युटी: काही राज्यांमध्ये कर्ज करारावर स्टॅम्प ड्युटी लागते, नोटीस फी: जर तुम्ही एखादा हप्ता चुकला, तर बँक तुम्हाला कळवण्यासाठी 'नोटीस चार्जेस' लावते, जे अनेकदा खूप जास्त असतात.
advertisement
7/10
4. लिलावाचा (Auction) धोका आणि अधिकारजर तुम्ही सलग काही महिने व्याज किंवा मुद्दल भरली नाही, तर बँक तुमचं सोनं लिलावात काढू शकते.सोनं लिलावात काढण्यापूर्वी बँक तुम्हाला नोटीस देते, पण लिलावानंतर जर सोन्याची किंमत तुमच्या कर्जापेक्षा जास्त आली, तर उरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेकडे चकरा माराव्या लागतात. अनेकदा ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची असते की लोकांना आपले हक्काचे पैसे मिळत नाहीत.
advertisement
8/10
5. प्री-पेमेंट पेनल्टीअनेकांना वाटतं की हातात पैसे आले की लगेच सोनं सोडवून घेऊ. पण काही बँका आणि गोल्ड फायनान्स कंपन्या 'प्री-पेमेंट पेनल्टी' आकारतात.तुम्ही मुदतीपूर्वी कर्ज फेडलं तर बँक त्यांच्या होणाऱ्या व्याजाच्या नुकसानाची भरपाई म्हणून तुमच्याकडून 1 ते 2 टक्के दंड वसूल करू शकते. कर्ज घेण्यापूर्वी हा मुद्दा आवर्जून विचारला पाहिजे.
advertisement
9/10
आपण फक्त 'कमी व्याजदर' कुठे आहे हे बघतो. पण त्या व्याजाची पद्धत कोणती आहे. सिंपल इंटरेस्ट (Simple Interest) की कंपाऊंड इंटरेस्ट (Compound Interest), हे तपासायला विसरतो. जर चक्रवाढ व्याज (Compound) असेल, तर मुदतीच्या शेवटी तुम्हाला दागिन्यांच्या किमतीपेक्षा जास्त व्याज भरावं लागू शकतं.
advertisement
10/10
गोल्ड लोन हे नक्कीच फायदेशीर आहे, कारण ते सुरक्षित असतं. पण डोळे झाकून कोणत्याही कागदावर सही करू नका. प्रोसेसिंग फी, व्हॅल्युएशन चार्जेस आणि लिलावाच्या अटी याबद्दल बँकरला स्पष्टपणे विचारा. तुमचं सोनं तुमची संपत्ती आहे, तिची किंमत तुम्हाला पूर्ण मिळायलाच हवी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Loan : सोन्यावर कर्ज घेताना बँका 'या' गोष्टी कधीच सांगत नाहीत, पण सर्वसामान्यांना माहित असणं गरजेचं