Cheque ला मराठीत काय म्हणतात? 100 मधून 90 लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणत्याही मोठ्या ट्रांझेक्शनसाठी तुम्ही कधीना कधी चेकचा वापर केला असेल. प्रत्येक बँक अकाउंट ओपन केल्यानंतर ग्राहकाला चेकबुकही देते. जेणेकरुन ऑनलाइन आणि रोख रकमेसोबतच या मार्गानेही पैसे दिले जाऊ शकतील. पण याला मराठीत काय म्हणतात माहितीये का?
advertisement
1/6

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे. देवाण-घेवाणीसाठी जास्तीत जास्त लोक पासबुक, एटीएमचाच वापर करतात. <a href="https://news18marathi.com/photogallery/money/bank-meaning-in-marathi-what-is-the-full-form-of-bank-99-percent-people-do-not-know-the-meaning-mhmv-1142581.html">बँके</a>कडून या दोन्ही सुविधांसोबतच चेकबुकने पैसे देवाणघेवाणीची सुविधाही दिली जाते. मोठ्या अमाउंटची देवाण-घेवाण किंवा रेकॉर्ड ठेवण्याच्या व्यवहारांसाठी लोक नेहमीच चेकच्या माध्यमातून पूर्ण करतात. पण चेकला मराठीत आणि हिंदीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
advertisement
2/6
खरंतर चेक बँकिंग सिस्टमचं असं एक साधन आहे, ज्याच्या माध्यमातून व्यक्ती बँकेला एखाद्या व्यक्ती विशेषला पैसे देण्यासाठी जारी करते. ज्या व्यक्तीला पैसे दिले जाणार आहेत, त्याचं नाव यावर लिहावं लागतं. मग हे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं किंवा कंपनी किंवा संस्थेचं असू शकतं. चेकमध्ये रक्कमही लिहावी लागते. यासोबतच चेकवर हस्ताक्षर करणंही गरजेचं असतं.
advertisement
3/6
चेक एवढा कॉमन वापरला जाणारा शब्द आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की याला हिंदीमध्ये किंवा मराठीत काय म्हणतात. स्पर्धा परीक्षांमध्ये असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. काही माहिती अशा असतात, ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी संबंधित असतात. यासाठी आपल्याला त्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं असतं.
advertisement
4/6
तर आज आपण चेकला मराठी आणि हिंदीमध्ये काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत. चेकला हिंदी आणि मराठी दोन्हीमध्येही धनादेश असं म्हटलं जातं. चेक बँकेद्वारे अकाउंटधारकाला जारी केलेला फक्त एक पेपर असतो. ज्यामध्ये धन देण्याचा आदेश असतो.
advertisement
5/6
तुम्ही पाहिलं असेल की, अमाउंटसोबत नेहमी Only असं लिहिलं जातं. कोणतीही मोठी संस्था किंवा व्यापारी चेक जारी करतात, तेव्हा रकमेनंतर Only अवश्य लिहितात. खरंतर यामागे पण एक कारण आहे. ते कारणही आपण जाणून घेऊया.
advertisement
6/6
Only लिहिलं जातं कारण फसवणूक टाळता यावी. समजा तुम्ही चेक जारी करताना त्यावर 25 हजार लिहिलं आणि अखेरीस Only लिहिलं नाही, अशा वेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याच्यासमोर आणखी अमाउंट टाकली तर तुमची अडचण होईल. म्हणूनच रकमेसमोर Only असं लिहितात.