Diwali Trading Muhurat : पैसे आताच काढून ठेवा, दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगचा टाईम बदलला, प्रॉफिट बूक करायची संधी!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Diwali Trading Muhurat : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
1/7

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दोन्ही प्रमुख बाजारपेठांमध्ये दुपारी 1.30 ते 3 या वेळेत हे ट्रेडिंग होणार आहे. पारंपरिकरीत्या ही परंपरा संध्याकाळी होत असली तरी यंदा एक्सचेंजच्या विनंतीनुसार दुपारचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
2/7
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे शुभ मुहूर्तावर केलेली प्रतीकात्मक गुंतवणूक. लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी केलेल्या व्यवहारामुळे वर्षभर समृद्धी, धनलाभ आणि शुभ फल प्राप्त होते, अशी व्यापारी आणि गुंतवणूकदारांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या मुहूर्तावर नवीन गुंतवणुकीचा प्रारंभ करतात.
advertisement
3/7
ही परंपरा 1957 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू झाली. या दिवशी व्यापारी आपल्या वह्यांचे चोपडा पूजन करतात, लक्ष्मीपूजन करून नव्या आर्थिक वर्षासाठी शुभारंभ करतात. पारंपरिक श्रद्धेप्रमाणे या दिवशी थोडेसे शेअर्स खरेदी करून वर्षभरासाठी शुभ संकेत मिळावेत, हा हेतू असतो.
advertisement
4/7
गुंतवणूकदार विनय नेर्लेकर यांच्या मते, मुहूर्त ट्रेडिंग हा दिवस फक्त प्रतीकात्मक गुंतवणुकीसाठी आहे. कमी वेळेमुळे बाजारात अस्थिरता अधिक असू शकते, त्यामुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक टाळावी. एखाद्या शेअरची किंमत खाली गेल्यास तो तोटा भरून काढायला वेळ लागू शकतो. त्यामुळे फक्त थोड्या रकमेची गुंतवणूक करावी आणि तीही फ्रंट लाईन स्टॉक्समध्ये करावी.
advertisement
5/7
मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी एकूण कालावधी सुमारे दीड तासाचा असतो. यात 15 मिनिटांचे प्री-ओपन सेशन आणि शेवटी 15 मिनिटांचे पोस्ट-क्लोजिंग सेशन असते. यामध्ये गुंतवणूकदारांना मर्यादित वेळेत व्यवहार करावे लागतात. त्यामुळे बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
advertisement
6/7
तज्ज्ञांच्या मते, हा दिवस अल्पकालीन नफा मिळवण्यासाठी नसून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शुभ मानला जातो. इंट्रा-डे ट्रेडिंग किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स सारखे धोकादायक व्यवहार टाळावेत. या दिवशी गुंतवणूकदारांनी स्थिर कंपन्यांचे, म्हणजेच टॉप ५ स्टॉक्सचे शेअर्स घेणे योग्य ठरते.
advertisement
7/7
मुहूर्त ट्रेडिंग हा केवळ आर्थिक व्यवहार नसून भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक अर्थकारण यांचा संगम आहे. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर केलेली लहानशी गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांसाठी नवा उत्साह, नवीन आशा आणि नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते. दिवाळीच्या प्रकाशात भरभराटीचा शुभ संदेश देणारा मुहूर्त ट्रेडिंग हा सण सध्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी शुभारंभाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Diwali Trading Muhurat : पैसे आताच काढून ठेवा, दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगचा टाईम बदलला, प्रॉफिट बूक करायची संधी!