EMI चा फुलफॉर्म काय असेल बरं? बेट लावून सांगतो 10 पैकी 9 जण चुकीचंच उत्तर देणार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या शब्दाचा आपण दिवसातून दहा वेळा उच्चार करतो, त्या 'EMI' चा नक्की अर्थ काय आहे, हे विचारलं तर 10 पैकी 9 लोक चुकीचं उत्तर देतात. जर तुम्हालाही वाटत असेल की 'ई' म्हणजे 'इझी' (Easy), तर तुम्ही आजवर तुम्हाला चुकीची माहिती आहे.
advertisement
1/9

आजच्या काळात कोणाच्याही हातात लेटेस्ट आयफोन (iPhone) दिसला किंवा कोणाच्या घराबाहेर नवी कोरी गाडी उभी असलेली दिसली, तर लोक हे विचारतात की EMI वर घेतली की कॅश? आजकाल लोन घेणं सोपं झाल्यामुळे लोक EMI वर वस्तू घेणं आता सामान्य झालं आहेय. मग ते घर असो, लॅपटॉप असो किंवा अगदी महागडे कपडे; आज 'हप्ते' भरणं हे मध्यमवर्गीय भारतीयांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. "ती वस्तू घेण्याऐवढे पैसे नाहीत तरी काय झालं? हप्ते आहेत ना." ही वृत्ती सध्या घराघरांत पाहायला मिळते.
advertisement
2/9
पण गंमत म्हणजे, ज्या शब्दाचा आपण दिवसातून दहा वेळा उच्चार करतो, त्या 'EMI' चा नक्की अर्थ काय आहे, हे विचारलं तर 10 पैकी 9 लोक चुकीचं उत्तर देतात. जर तुम्हालाही वाटत असेल की 'ई' म्हणजे 'इझी' (Easy), तर तुम्ही आजवर चुकीच्या समजुतीत होता. चला तर मग, या हप्त्यांच्या गणितामागचा खरा अर्थ आणि रंजक इतिहास जाणून घेऊया.
advertisement
3/9
बहुतेक लोक सोयीनुसार EMI चा फुलफॉर्म 'Easy Monthly Installment' असा सांगतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्याही या शब्दाचा वापर करतात, जेणेकरून हप्ते भरणं सोपं वाटेल. पण बँकिंग आणि फायनान्सच्या जगात याचा खरा फुलफॉर्म 'Equated Monthly Installment' असा आहे.
advertisement
4/9
Equated म्हणजे 'समान'.Monthly म्हणजे 'मासिक'.Installment म्हणजे 'हप्ता'.म्हणजेच, कर्जाची मुद्दल आणि त्यावरील व्याज यांची अशी विभागणी करणं, ज्यामुळे दर महिन्याला तुम्हाला एकच ठराविक रक्कम भरावी लागते.
advertisement
5/9
EMI ची सुरुवात नक्की कुठे झाली?हप्त्यावर सामान घेण्याची ही पद्धत आपल्याला आधुनिक वाटत असली, तरी तिचा इतिहास जुना आहे. रिपोर्ट्सनुसार, EMI ची ही संकल्पना सर्वात आधी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये जन्माला आली. 1970 च्या दशकात अमेरिकन बाजारपेठेत ही पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली, ज्यामुळे लोकांची खरेदी करण्याची शक्ती वाढली.
advertisement
6/9
भारतात मात्र ही संकल्पना खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचली ती ऑनलाइन शॉपिंगमुळे. असं मानलं जातं की, ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) 2016 मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर EMI चा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर भारतीय ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीत मोठी क्रांती झाली.
advertisement
7/9
EMI वर वस्तू घेताना 'हे' लक्षात ठेवा1. प्रक्रिया शुल्क (Processing Fee): अनेकदा 'नो कॉस्ट ईएमआय' (No Cost EMI) सांगून आपल्याकडून फाईल चार्ज किंवा प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे घेतले जातात.2. व्याजदर: तुम्ही जो हप्ता भरता, त्यात सुरुवातीच्या काळात व्याजाचा हिस्सा जास्त असतो आणि मुद्दलीचा (Principal) कमी.
advertisement
8/9
3. क्रेडिट स्कोअर: जर तुम्ही एखादा हप्ता चुकलात, तर तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर त्याचा वाईट परिणाम होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणं कठीण होतं.
advertisement
9/9
थोडक्यात काय तर EMI ही सुविधा नक्कीच चांगली आहे, कारण ती आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते. पण तिचा अर्थ आणि त्यातील अटी समजून घेऊनच आर्थिक पाऊल उचलणं कधीही हिताचं ठरतं. पुढच्या वेळी कोणासमोर EMI चा उल्लेख कराल, तेव्हा त्याचा खरा अर्थ सांगायला विसरू नका
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
EMI चा फुलफॉर्म काय असेल बरं? बेट लावून सांगतो 10 पैकी 9 जण चुकीचंच उत्तर देणार