Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बिल कोण भरतं? घरच्यांवर येते का जबाबदारी? जाणून घ्या बँकेचे 'हे' नियम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का की, जर दुर्दैवाने क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला, तर त्या कार्डवर असलेलं हजारो किंवा लाखांचं कर्ज कोणाला भरावं लागतं? बँक ही वसुली मृताच्या कुटुंबाकडून करते का? की घरातील सदस्यांना हे बिल भरावं लागतं?
advertisement
1/8

आजच्या काळात आपल्या खिशात रोख रक्कम असो वा नसो, पण एक प्लास्टिकचं कार्ड नक्कीच असतं ते म्हणजे क्रेडिट कार्ड हॉटेलचं बिल भरणं असो, ऑनलाईन शॉपिंग असो किंवा आपत्कालीन काळात पैशांची सोय, क्रेडिट कार्ड आपल्याला मोठा आधार देतं. आधी खर्च करा आणि नंतर पैसे भरा ही सवय आता आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकच्या मोहजालामुळे आज प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पाकिटात किमान एक तरी क्रेडिट कार्ड असतंच.
advertisement
2/8
पण, कधी विचार केलाय का की, जर दुर्दैवाने क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला, तर त्या कार्डवर असलेलं हजारो किंवा लाखांचं कर्ज कोणाला भरावं लागतं? बँक ही वसुली मृताच्या कुटुंबाकडून करते का? की घरातील सदस्यांना हे बिल भरावं लागतं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
3/8
जर क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला, तर बँक त्याचे बिल वसूल करण्यासाठी खालील मार्ग अवलंबतेमालमत्ता आणि गुंतवणूक: बँकेचे पहिले लक्ष मृताच्या नावावर असलेल्या गुंतवणुकीवर, मालमत्तेवर किंवा इतर मालमत्तेवर असते. जर त्या व्यक्तीच्या नावावर कोणतीही मालमत्ता असेल, तर त्यातून बँक आपली थकबाकी वसूल करू शकते.
advertisement
4/8
कुटुंबावर बोजा नाही:सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्रेडिट कार्ड हे वैयक्तिक कर्ज मानले जाते. त्यामुळे, कार्ड धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे बिल भरण्याची कायदेशीर जबाबदारी त्याच्या कुटुंबावर किंवा वारसांवर नसते. बँक कुटुंबाला हे बिल भरण्यासाठी सक्ती करू शकत नाही.
advertisement
5/8
बॅड डेट (Bad Debt):जर मृत व्यक्तीच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसेल किंवा मालमत्तेची किंमत थकीत बिलापेक्षा कमी असेल, तर बँक उरलेली रक्कम बॅड डेट किंवा 'NPA' (Non-Performing Assets) म्हणून घोषित करते आणि ते खाते बंद करते.
advertisement
6/8
बँक तुमची 'क्रेडिट लिमिट' कशी ठरवते?तुमच्या कार्डवर तुम्हाला किती खर्च करण्याची मुभा असेल, हे ठरवण्यासाठी बँक काही महत्त्वाचे निकष लावते:1. पगार आणि नोकरी: बँक तुमचे मासिक उत्पन्न, तुमची कंपनी आणि तुमची नोकरी किती स्थिर आहे, हे सर्वात आधी तपासते.2. क्रेडिट स्कोअर (CIBIL): तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा असतो. जर तुम्ही आधीची कर्जं किंवा बिले वेळेवर भरली असतील, तर तुमचा स्कोअर चांगला असतो आणि तुम्हाला जास्त लिमिट मिळते.3. खर्चाची पद्धत: तुम्ही जबाबदारीने खर्च करता की उधळपट्टी, हे देखील बँक तुमच्या मागील रेकॉर्डवरून तपासत असते.
advertisement
7/8
क्रेडिट कार्ड हे सोयीचं असलं तरी ते एक कर्जच आहे. त्यामुळे त्याचा वापर जबाबदारीने करणे हिताचे असते. मात्र, धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे बिल भरण्याचा बोजा कुटुंबावर पडत नाही, हा एक मोठा कायदेशीर दिलासा आहे.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बिल कोण भरतं? घरच्यांवर येते का जबाबदारी? जाणून घ्या बँकेचे 'हे' नियम