TRENDING:

Gold Price : सोन्याचे दागिने विकले की त्याचे कमी पैसे का येतात? घट मागचं गुपित क्वचित कोणाला माहित असेल

Last Updated:
melted gold gives less money, : तुमच्यासोबतही असं झालंय का? सोने वितळवल्यावर पैसे अपेक्षेपेक्षा कमीच पैसे मिळालेत? मग हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं
advertisement
1/8
दागिने वितळवले… पण पैसे कमीच का मिळाले? सोन्याच्या घट मागचं गुपित माहितीय?
प्रत्येकाच्या घरात थोड्याफार प्रमाणात सोनं असतंच. लग्नात मिळालेली दागिने, आई-आजीकडून जपून ठेवलेली चैन किंवा एखाद्या सणाला घेतलेली अंगठी. कानातले मंगळसुत्र अशागोष्टी लोकांकडे असतात. कधी पैशांची गरज पडली, तर अनेक जण हेच दागिने विकून पैसे मिळवतात. पण असं अनेकदा लोकांसोबत होतं की प्रत्यक्षात जेव्हा सोने विकायला जातो, तेव्हा हातात येणारी रक्कम पाहून बरेच जण चकित होतात. इतकं सोने असूनही पैसे एवढे कमी कसे? असा प्रश्न हमखास पडतो.
advertisement
2/8
म्हणजे जर घरातील सोनं 3-4 तोळं असेल आणि बाजारात सोन्याचा भाव ही जास्त आहे पण जेव्हा आपण हे सोनं विकायला जातो तेव्हा ते वितळवल्यानंतर त्याची किंमत फारच कमी होते, ती नेहमीच सध्या सुरु असलेल्या सोन्याच्या भावाशी मिळती जुळती नसते असं का?
advertisement
3/8
यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दागिन्यांचं सोने पूर्णपणे शुद्ध कधीच नसतं. आपल्याकडे बहुतांश दागिने 22 कॅरेटचे असतात. म्हणजेच दिसायला 100 ग्रॅम दागिने असले, तरी त्यात सुमारे 91-92 ग्रॅमच शुद्ध सोने असतं. उरलेलं वजन तांबे किंवा इतर धातूंचं असतं. वितळवताना या मिश्रधातूंची किंमत मिळत नाही, त्यामुळे पैसे कमी होतात.
advertisement
4/8
दुसरं कारण म्हणजे वितळवताना वजन थोडं कमी होतं. सोने वितळवताना उष्णतेमुळे अगदी थोडं सोने जळतं किंवा बाजूला जातं. हे प्रमाण जास्त नसतं, पण तरीही अंतिम वजनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे इतकं वजन होतं असं वाटलं, तरी प्रत्यक्षात विक्रीचं वजन कमी ठरतं.
advertisement
5/8
तिसरं कारण अनेकांना माहित नसतं ते म्हणजे दागिन्यांमधले दगड आणि जोडणी. बांगड्या, हार, कानातले यामध्ये हिरे, रंगीत दगड, मिना किंवा कुंदन असतं. हे सगळं आधीच वजनातून वजा केलं जातं. शिवाय दागिने जोडण्यासाठी वापरलेली सोल्डर ही शुद्ध सोन्याची नसते, त्यामुळे तिचीही किंमत मिळत नाही.
advertisement
6/8
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेकिंग चार्जेस. आपण दागिने घेताना मेकिंग चार्जेस भरतो, पण विकताना त्याचा एक रुपयाही परत मिळत नाही. त्यामुळे खरेदीवेळी दिलेली रक्कम आणि विक्रीवेळी मिळणारी रक्कम यात मोठा फरक जाणवतो.
advertisement
7/8
शेवटी येतो त्या दिवसाचा सोन्याचा दर आणि शुद्धतेची तपासणी. सोने ज्या दराने घेतलं, तोच दर मिळेलच असं नाही. शिवाय जर दागिन्यांवर हॉलमार्क नसेल, तर व्यापारी थोडी कमी शुद्धता धरून दर लावतात. हेही रक्कम कमी होण्याचं एक कारण ठरतं.
advertisement
8/8
थोडक्यात सांगायचं तर, दागिन्यांमधील मिश्रधातू, वितळवताना होणारी वजन घट, दगड-मिना, मेकिंग चार्जेस आणि चालू दर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे वितळवलेलं सोने अपेक्षेपेक्षा कमी पैसे देतं. म्हणूनच सोने विकण्याआधी दोन-तीन ठिकाणी चौकशी करणे, वजन नीट पाहणे आणि हॉलमार्क तपासणे फार गरजेचं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Price : सोन्याचे दागिने विकले की त्याचे कमी पैसे का येतात? घट मागचं गुपित क्वचित कोणाला माहित असेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल