IPL 2026 Auction : ऑक्शनच्या 24 तास आधी BCCI चा तडकाफडकी निर्णय, थेट लिस्ट बदलली; 19 खेळाडूंची डायरेक्ट एन्ट्री!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI change IPL 2026 Auction list : एका फ्रँचायझी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणात उशिरा नावं समाविष्ट होण्याची घटना यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/7

इंडियन प्रीमियर लीग (IPL2026) च्या लिलावासाठी अवघे 24 तास शिल्लक असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 19 नवीन खेळाडूंची नावे लिलाव नोंदणी यादीत समाविष्ट केली आहेत.
advertisement
2/7
बीसीसीआयच्या 19 खेळाडू अचानक घेतल्याने अबू धाबी येथील एतिहाद अरेनामध्ये होणाऱ्या लिलावातील एकूण खेळाडूंची संख्या 369 झाली आहे. त्यामुळे लिलावात अधिक तगडी फाईट पहायला मिळू शकते.
advertisement
3/7
Cricbuzz च्या वृत्तानुसार, लिलावाच्या इतक्या जवळ यादीत इतक्या मोठ्या संख्येने खेळाडूंचा अचानक समावेश करणं हे अभूतपूर्व असल्याचे मत फ्रँचायझी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
4/7
बीसीसीआयच्या नव्या यादीत नवीन खेळाडूंच्या समावेशात बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याचं नाव सर्वात महत्त्वाचं आहे. त्याने 30 लाखाच्या बेस प्राईजवर आपलं नाव नोंदवलंय.
advertisement
5/7
बीसीसीआयने नव्याने समाविष्ट केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित विकेटकीपर-फलंदाज व्हेरेन्ने 1.25 कोटी मूळ किमतीसह लिलावात उतरला आहे.
advertisement
6/7
वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुझाराबानी याचाही 75 लाखाच्या मूळ किमतीत समावेश करण्यात आला आहे.
advertisement
7/7
बीसीसीआयने मलेशियाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू विरनदीप सिंग याला 30 लाखांच्या मूळ किमतीत यादीत स्थान देण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस ग्रीन याचा 75 लाखात बोलवण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : ऑक्शनच्या 24 तास आधी BCCI चा तडकाफडकी निर्णय, थेट लिस्ट बदलली; 19 खेळाडूंची डायरेक्ट एन्ट्री!