TRENDING:

Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे'साठी परफेक्ट गिफ्ट आयडिया..! लव्ह पार्टनरला त्याच्या राशीनुसार या गिफ्टने द्याल सरप्राईज

Last Updated:
Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे प्रेमी जोडप्यांसाठी खास दिवस असतो. प्रेयसी-प्रियकर एकमेकांना भेटवस्तू देतात, हा केवळ भेटवस्तू देण्याचा दिवस नसून आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम आणि समर्पण व्यक्त करण्याचा क्षण असतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची आवड ही त्याच्या राशीवर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या राशीनुसार भेटवस्तू सिलेक्ट केली, तर ती त्यांना नक्कीच आवडेल. जाणून घेऊया 12 राशींसाठी परफेक्ट गिफ्ट आयडिया..
advertisement
1/12
'व्हॅलेंटाईन डे'साठी परफेक्ट गिफ्ट आयडिया..! लव्ह पार्टनरला राशीनुसार सरप्राईज
मेष - या राशीचे पुरुष उत्साही आणि धाडसी असतात. त्यांना सक्रिय जीवनशैली आवडते. त्यामुळे तुम्ही त्यांना ब्रँडेड स्नीकर्स, जिम ॲक्सेसरीज किंवा एखाद्या ॲडव्हेंचर ट्रिपचे व्हाउचर भेट देऊ शकता. हे त्यांच्यासाठी मोठे सरप्राईज ठरेल.
advertisement
2/12
वृषभ - वृषभ राशीच्या मुलांना टिकाऊ आणि उच्च दर्जाच्या वस्तू आवडतात. या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही त्यांना लेदर वॉलेट, लक्झरी परफ्यूम किंवा क्लासिक घड्याळ देऊ शकता. तसेच त्यांना त्यांच्या आवडीचे घरी बनवलेले पदार्थ खाऊ घातल्यास ते खूप आनंदी होतील.
advertisement
3/12
मिथुन - हे लोक जिज्ञासू आणि सामाजिक असतात. त्यांना डोकं चालवायला लावणारे किंवा ट्रेंडी गॅजेट्स आवडतात. तुम्ही त्यांना लेटेस्ट हेडफोन्स किंवा एखादे मनोरंजक पुस्तक देऊ शकता. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणे हेच त्यांच्यासाठी मोठे गिफ्ट असेल.
advertisement
4/12
कर्क - कर्क राशीचे लोक हळवे आणि संवेदनशील असतात. त्यांच्यासाठी भेटवस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची असते. तुम्ही त्यांना तुमच्या फोटोंचा कोलाज, कस्टमाइज्ड मग किंवा हाताने बनवलेले कार्ड देऊ शकता. एक छान डिनर डेट त्यांचा दिवस अविस्मरणीय करेल.
advertisement
5/12
सिंह - सिंह राशीच्या पुरुषांना स्वतःचे कौतुक केलेले आणि खास वाटलेले आवडते. त्यांना ब्रँडेड गोष्टींची हौस असते. तुम्ही त्यांना स्टायलिश सनग्लासेस, डिझायनर शर्ट किंवा महागडे घड्याळ भेट देऊ शकता. भेट देताना त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करायला विसरू नका.
advertisement
6/12
कन्या - कन्या राशीचे लोक खूप शिस्तप्रिय आणि व्यवस्थित असतात. त्यांना त्यांच्या कामात उपयोगी पडतील अशा वस्तू द्या. लेदर डायरी, स्मार्ट गॅजेट्स किंवा एखादा ऑर्गनायझर त्यांना नक्कीच आवडेल.
advertisement
7/12
तूळ - तूळ राशीच्या लोकांना सौंदर्य आणि कलात्मक गोष्टी आवडतात. ते रोमँटिक स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांना एखादा सुगंधी परफ्यूम, ट्रेंडी आउटफिट किंवा रोमँटिक कॅंडललाईट डिनर देऊ शकता. आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते.
advertisement
8/12
वृश्चिक - या राशीचे पुरुष गंभीर आणि निष्ठावान असतात. त्यांना वरवरच्या भेटींपेक्षा मनाला भिडणाऱ्या गोष्टी आवडतात. तुम्ही त्यांना एखादे सुंदर प्रेमपत्र लिहून देऊ शकता. तुमच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही भेट त्यांच्या कायम लक्षात राहील.
advertisement
9/12
धनु - धनु राशीच्या लोकांना फिरायची आणि नवीन गोष्टी शोधायची आवड असते. त्यांना ट्रॅव्हल बॅग, पोर्टेबल चार्जर किंवा एखाद्या नवीन ठिकाणी छोटी सहल अशा भेटवस्तू देऊ शकता. तुमच्यासोबत नवीन आठवणी बनवायला त्यांना नक्कीच आवडेल.
advertisement
10/12
मकर - मकर राशीची मुले त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात. त्यांच्या प्रोफेशनल इमेजला साजेसे असे प्रोफेशनल लॅपटॉप बॅग, ब्रँडेड पेन किंवा क्लासिक वॉच तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
advertisement
11/12
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना जगावेगळ्या आणि आधुनिक गोष्टींची आवड असते. त्यांना तंत्रज्ञान आणि नाविन्य आवडते. त्यामुळे एखादे अनोखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा सध्या ट्रेंडमध्ये असलेली एखादी वस्तू त्यांना भेट द्या.
advertisement
12/12
मीन - मीन राशीचे लोक खूप कल्पक आणि प्रेमळ असतात. त्यांना संगीताची एखादी प्लेलिस्ट, कवितेचे पुस्तक किंवा तुमच्या जुन्या आठवणींशी संबंधित एखादी भेटवस्तू देऊ शकता. त्यांची मनापासून काळजी घेणे हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे'साठी परफेक्ट गिफ्ट आयडिया..! लव्ह पार्टनरला त्याच्या राशीनुसार या गिफ्टने द्याल सरप्राईज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल