TRENDING:

IPL 2026 : कीपरने स्टंप नाही तर बॉलरवरच हाणला थ्रो... मग गेल्या 2 विकेट, एकाच ओव्हरमध्ये भरपूर ड्रामा!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या मोसमात केकेआर आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात भरपूर ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : आयपीएल 2026 च्या मोसमात केकेआर आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात भरपूर ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यानंतर पंजाबच्या बॉलरनी सुरूवातीपासून केकेआरला धक्के दिले. पंजाबचा फास्ट बॉलर झेवियर बार्टलेट इनिंगची दुसरी आणि त्याची पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला आणि त्याने केकेआरला दोन धक्के दिले.
कीपरने स्टंप नाही तर बॉलरवरच हाणला थ्रो... मग गेल्या 2 विकेट, एकाच ओव्हरमध्ये भरपूर ड्रामा!
कीपरने स्टंप नाही तर बॉलरवरच हाणला थ्रो... मग गेल्या 2 विकेट, एकाच ओव्हरमध्ये भरपूर ड्रामा!
advertisement

बार्टलेटच्या घातक बॉलिंगसमोर केकेआरची टॉप ऑर्डर कोसळली. या ओव्हरमध्ये बार्टलेटने फक्त वेगानेच बॉल टाकले नाहीत तर स्विंगही केले. बार्टलेटच्या बॉलिंगसमोर केकेआरच्या बॅटरनी अक्षरश: गुडघे टेकले.

प्रभसिमरनने बार्टलेटला मारला बॉल

ओव्हरच्या सुरूवातीलाच मैदानात नाट्यमय घडामोडी घडल्या. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फिन ऍलन स्कूप शॉट मारायला गेला, पण बॉल विकेट कीपर प्रभसिमरनच्या जवळ गेला. यानंतर ऍलन एक रन काढण्यासाठी जात होता, पण तेवढ्यात प्रभसिमरनने बॉल थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल बार्टलेटच्या अंगावर जाऊन आदळला. सुदैवाने बार्टलेटला गंभीर दुखापत झाली नाही.

advertisement

बार्टलेटने मग दिले दोन धक्के

advertisement

बॉल लागल्यानंतर लगेचच बार्टलेटने केकेआरला पहिला धक्का दिला. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर त्याने फिन ऍलनला 6 रनवर आऊट केलं. बार्टलेटच्या स्विंग बॉलिंगवर ऍलन मोठा शॉट मारायला गेला, पण बॉल बॅटच्या एजला लागून विकेट कीपर प्रभसिमरनच्या हातात गेला. बार्टलेटच्या पूर्ण ओव्हरमध्ये ऍलन संघर्ष करताना दिसत होता. अखेर आऊटस्विंग बॉलवर ऍलन त्याची विकेट देऊन बसला.

advertisement

ऍलनच्या विकेटमधून केकेआर सावरली नव्हती तर पुढच्याच बॉलवर बार्टलेटने कॅमरून ग्रीनलाही आपलं शिकार बनवलं. ग्रीनने मैदानात येताच एक फोर मारली पण तोदेखील बार्टलेटच्या जाळ्यात अडकला. लेन्थ बॉलवर ग्रीनने शरिरापासून लांब शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, आणि पुन्हा एकदा प्रभसिमरनने कॅच पकडला.

पावसामुळे सामना रद्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

बार्टलेटने पहिल्या दोन विकेट घेतल्यानंतर कोलकात्यामध्ये पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरू झाला तेव्हा केकेआरचा स्कोअर 25/2 एवढा होता, पण पाऊस थांबला नसल्यामुळे हा सामना रद्द करून दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला गेला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : कीपरने स्टंप नाही तर बॉलरवरच हाणला थ्रो... मग गेल्या 2 विकेट, एकाच ओव्हरमध्ये भरपूर ड्रामा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल