TRENDING:

IPL 2026 : मॅच कॅन्सल, पण पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, चौथ्या क्रमांकाची पंजाब टॉपला, मुंबई कितव्या नंबरवर?

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पण सामना रद्द झाला असला तरी पॉईंट्स टेबलमध्ये मात्र उलटफेर झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : आयपीएल 2026 मध्ये केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण केकेआरने 3.4 ओव्हरमध्ये 25 रनवर 2 विकेट गमावल्या, यानंतर कोलकात्यामध्ये पावसाला सुरूवात झाली. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर अंपायरनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द झाल्यानंतर केकेआर आणि पंजाब किंग्सला एक-एक पॉईंट्स देण्यात आले.
मॅच कॅन्सल, पण पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, चौथ्या क्रमांकाची पंजाब टॉपला, मुंबई कितव्या नंबरवर?
मॅच कॅन्सल, पण पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, चौथ्या क्रमांकाची पंजाब टॉपला, मुंबई कितव्या नंबरवर?
advertisement

केकेआरला पहिला पॉईंट

आयपीएलच्या या मोसमात केकेआरचा पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला होता, त्यामुळे त्यांचे शून्य पॉईंट होते. आता सामना रद्द झाल्यामुळे केकेआरला अखेर या मोसमातला त्यांचा पहिला पॉईंट मिळाला आहे. दुसरीकडे पंजाबने मात्र सुरूवातीलाच केकेआरला अडचणीत आणलं होतं, त्यामुळे सामना जिंकून 2 पॉईंट्स खिशात टाकण्याची संधी हातातून गेल्याचं पंजाबला वाटेल. हा सामना जिंकून पंजाबचे 3 सामन्यांमध्ये 3 विजयांसह 6 पॉईंट्स झाले असते, पण आता पंजाबकडे 5 पॉईंट्स आहेत.

advertisement

पंजाब टॉपवर

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये 3 सामन्यांमध्ये 5 पॉईंट्ससह पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबचा नेट रनरेट हा +0.637 एवढा आहे. या सामन्याच्या आधी पंजाब चौथ्या क्रमांकावर होती, पण फक्त एक पॉईंट मिळाल्यानंतरही श्रेयस अय्यरची टीम चौथ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर आली आहे.

पॉईंट्स टेबलची स्थिती

पंजाब पहिल्या क्रमांकावर गेल्यामुळे आरसीबी दुसऱ्या राजस्थान तिसऱ्या आणि दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही टीमनी त्यांचे 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. प्रत्येकी 4 पॉईंट्स असूनही नेट रनरेटमुळे या टीम वेगवेगळ्या क्रमांकावर आहेत.

advertisement

मुंबई इंडियन्स कितव्या क्रमांकावर?

3 सामन्यांमध्ये एक विजय आणि दोन पराभवांसह सनरायजर्स हैदराबाद पाचव्या तर 2 मॅचमध्ये एक विजय आणि एका पराभवासह मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. सनरायजर्स हैदराबादचा नेट रनरेट हा +0.275 तर मुंबईचा नेट रनरेट हा मायनस -0.206 आहे, त्यामुळे मुंबई हैदराबादच्या मागे आहे. मुंबईप्रमाणेच लखनऊनेही 2 पैकी 1 सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे, पण लखनऊचा नेट रनरेट मायनस 0.542 असल्यामुळे ते सातव्या क्रमांकावर आहेत.

advertisement

चेन्नई शेवटच्या क्रमांकावर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

3 सामन्यांमध्ये 2 पराभव आणि एक सामना रद्द झाल्यामुळे केकेआर एका पॉईंटसह आठव्या क्रमांकावर आहे. तर गुजरात आणि चेन्नई यांचा 2 पैकी 2 सामन्यात पराभव झाला आहे, त्यामुळे गुजरात नवव्या आणि चेन्नई दहाव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मॅच कॅन्सल, पण पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, चौथ्या क्रमांकाची पंजाब टॉपला, मुंबई कितव्या नंबरवर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल