चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा. कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेखरवर खंडणी, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली होती, तेव्हापासून तो फरार होता. तो वडगाव येथील प्रयेजा सिटी परिसरातील एस.आर.ए. बिल्डिंगजवळ आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.
advertisement
पोलिसांचा 'मास्टर प्लॅन' आणि अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचला. शेखर तिथे पोहोचताच पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने त्याला वेढा घातला. चार महिने पोलिसांना गुंगारा देणारा शेखर या 'सापळ्यात' अलगद अडकला.
गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा
शेखर ठोंबरे हा संतोषनगर, कात्रज परिसरातील एक सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अटकेमुळे परिसरात चालणाऱ्या संघटित गुन्हेगारीला मोठा लगाम बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही धाडसी कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
