Shubhman Gill : तेलही गेलं तूपही गेलं! व्हाईस कॅप्टन्सीसह शुभमनला का मिळाला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू, कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI Removed Shubhman Gill Vice Captaincy : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मुंबईत झालेल्या मिटिंगनंतर चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि चेतन साकरिया यांनी टीम इंडियाची घोषणा केली.
advertisement
1/5

बीसीसीआयने जाहीर केलेल्या स्कॉडमध्ये टीम इंडियाच्या 15 खेळाडूंना एन्ट्री देण्यात आली आहे. तर यावेळी एका खेळाडूची सरप्राईज एन्ट्री झालीये. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून इशान किशन आहे.
advertisement
2/5
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अफलातून कामगिरीचं गिफ्ट बीसीसीआयने इशान किशनला दिलं. यावेळी मात्र बीसीसीआयने टीम इंडियाच्या व्हाईस कॅप्टनची हकालपट्टी केली आहे.
advertisement
3/5
होय, टीम इंडियाचा स्टाडिंग कॅप्टन शुभमन गिलची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या स्कॉडमध्ये संधी मिळाली नाही.
advertisement
4/5
शुभमन गिल साऊथ अफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करत नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत त्याने 4 मॅचमध्ये 168 रन्स केले. यात एका अर्धशतकाचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 145 राहिला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, अखेरच्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी केलेल्या संजू सॅमसनला आता टीम इंडियात परमनेंट ओपनर म्हणून जागा मिळाली आहे. आता संजूच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shubhman Gill : तेलही गेलं तूपही गेलं! व्हाईस कॅप्टन्सीसह शुभमनला का मिळाला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू, कारण काय?