Indian Cricket team : बीसीसीआयने पेटारा उघडला, टीम इंडियाच्या खेळाडूंची मॅच फी झाली डबल, 11 खेळाडूंना किती पैसे मिळणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI Revises Pay Structure : बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता वुमेन्स क्रिकेटर्सला देखील पुरूषांप्रमाणे समसमान मॅच फी मिळणार आहे.
advertisement
1/7

नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारतीय वुमेन्स टीमने इतिहास रचला अन् वर्ल्ड कपला गवसणी घातली. अशातच आता बीसीसीआय या कामगिरीवर खुश असल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
2/7
कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखील पोरींनी कमाल केली अन् आता बीसीसीआयने वूमन्स क्रिकेटसाठी मोठा निर्णय घेतलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समसमान मॅच फी मिळणार आहे.
advertisement
3/7
बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी यांच्या मॅच फीमध्ये तब्बल दुप्पटीपेक्षा जास्त वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. वनडे आणि मल्टी डे मॅचेससाठी मोठी रक्कम देण्याचं ठरवलं आहे.
advertisement
4/7
वनडे आणि मल्टी डे मॅचेससाठी एका दिवसासाठी 50 हजार रुपये मिळणार आहेत. तर राखीव खेळाडूंना 25 हजार रुपये मानधन मिळेल. तसेच टी-20 सामन्यासाठी 25 हजार रुपये मिळेल. तर 12 हजार रुपये राखीव खेळाडूंना मिळतील.
advertisement
5/7
बीसीसीआय याआधी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना 20 तर इतर खेळाडूंना 10 हजार रुपये मानधन देत होतं. तसेच ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेतील महिला खेळाडूंना प्रतिदिन 25 हजार रुपये मानधन मिळेल.
advertisement
6/7
फक्त प्लेयर्सच नाही तर मॅच रेफरीच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलीये. शांतर्गत स्पर्धेतील साखळी फेरीतील क्रिकेट सामन्यासाठी प्रतिदिन 40 हजार रुपये मिळेल.
advertisement
7/7
दरम्यान, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील एका सामन्यासाठी 1 लाख 60 हजार तर बाद फेरीतील सामन्यासाठी अडीच ते 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Indian Cricket team : बीसीसीआयने पेटारा उघडला, टीम इंडियाच्या खेळाडूंची मॅच फी झाली डबल, 11 खेळाडूंना किती पैसे मिळणार?