‘4-5 वेळा कॉल आला अन् विचारलं माझ्या हिरोला कधी भेटणार?’ मोदींना भेटताच अरुंधती रेड्डीने सांगितला आईचा किस्सा!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी दक्षिण अफ्रिकेच्या संघाला नमवून वनडे इंटरनॅशनल विश्वकपला गवसणी घातली. अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये कप जिंकला.
advertisement
1/6

2/6
महिला संघाच्या या अभूतपूर्व यशाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या विजयाने क्रिकेट चाहत्यांचा महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलून टाकला आहे. बीसीसीआयसह सरकारकडून क्रिकेट टीमसाठी मोठ्या बक्षीसाची घोषणाही करण्यात आली आहे.
advertisement
3/6
दरम्यान, सर्व महिला टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मोदींनी भारतीय महिला टीमसोबत संवाद साधला. त्यांचा स्ट्रगल, त्यांनी केलेली कामगिरी आणि भविष्यातील प्लॅनिंग अशा सर्वंच बाबींवर चर्चा झाली.
advertisement
4/6
यावेळी भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीनेही मोदींशी संवाद साधला. आपली आई तुम्हाला हिरो मानते, असं अरुंधतीने सांगितलं.
advertisement
5/6
शिवाय तू माझ्या हिरोला कधी भेटणार आहे, असं म्हणत आईने आपल्याला आतापर्यंत चार ते पाच वेळा कॉल केल्याचं देखील अरुंधतीने सांगितलं. यानंतर मोदींनी देखील अरुंधतीला आणि तिच्या आईला शुभेच्छा दिल्या.
advertisement
6/6
अरुंधती रेड्डी ही भारताची वेगवाग गोलंदाज आहे. तिने भारतासाठी आतापर्यंत 11 वन डे आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान तिने वनडे मध्ये 15 तर टी-20 मध्ये एकूण 34 विकेट्स काढल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
‘4-5 वेळा कॉल आला अन् विचारलं माझ्या हिरोला कधी भेटणार?’ मोदींना भेटताच अरुंधती रेड्डीने सांगितला आईचा किस्सा!