TRENDING:

IND vs SA : पराभवाचे व्हिलन कोण? मॅचनंतर कॅप्टन सूर्याने थेट घेतली दोघांची नावे

Last Updated:
साऊथ आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतासोबत 1-1ने बरोबरी साधली आहे. यानंतर कॅप्टन सूर्याने पराभवाला जबाबदार ठरलेल्या दोघांची नावे सांगितली आहे.
advertisement
1/7
IND vs SA : पराभवाचे व्हिलन कोण? मॅचनंतर कॅप्टन सूर्याने थेट घेतली दोघांची नावे
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 162 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 51 धावांनी जिंकला आहे.
advertisement
2/7
या पराभवानंतर साऊथ आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतासोबत 1-1ने बरोबरी साधली आहे. यानंतर कॅप्टन सूर्याने पराभवाला जबाबदार ठरलेल्या दोघांची नावे सांगितली आहे.
advertisement
3/7
सूर्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सामन्यानंतर गोलंदाजी घ्यायवा हवी होती, असे सुर्यकुमार बोलला आहे. आम्ही आधी गोलंदाजी केली आणि नंतर त्यांना समजले की या विकेटवर लेंथ किती महत्त्वाच्या आहेत. पण हो, ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. फक्त शिका आणि पुढे जा,असे सूर्या म्हणाला आहे.
advertisement
4/7
थोडेसे दव पडणे आणि जर ते काम करत नसेल तर आम्हाला दुसरी योजना आखायला हवी होती, पण आम्ही त्याकडे गेलो नाही. पण ते ठीक आहे. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. त्यांनी दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी केली हे आम्हाला शिकायला मिळाले. आम्ही त्यातून शिकलो आणि नंतर आम्ही पुढच्या सामन्यात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असे देखील सूर्याने सांगितले आहे.
advertisement
5/7
सूर्यकुमार यादवने यावेळी स्वत:ला आणि शुभमन गिलला पराभवाचं व्हिलन ठरवलं आहे. मला वाटतं मी आणि शुभमन चांगली सुरुवात देऊ शकलो असतो.कारण आम्ही नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यामुळे त्याचा ऑफ-डे असू शकतो. मी, शुभमन आणि इतर काही फलंदाजांनी ते स्वीकारायला हवे होते,असे सांगत सूर्याने पराभवाची जबाबदारी स्विकारली.
advertisement
6/7
शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण मी ती जबाबदारी घ्यायला हवी होती, थोडी खोलवर फलंदाजी करायला हवी होती. पण हो, मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही शिकतो, आम्ही पुढच्या सामन्यात चांगले करण्याचा प्रयत्न करू असेही सूर्या म्हणाला आहे.
advertisement
7/7
आम्हाला फक्त गेल्या सामन्यात वाटले होते की, आम्ही अक्षरला दीर्घ स्वरूपात खूप चांगली फलंदाजी करताना पाहिले आहे. आणि आम्हाला त्याला आजही त्याच पद्धतीने फलंदाजी पाहायची होती.पण तशी फलंदाजी झाली नाही,असे सूर्याने सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : पराभवाचे व्हिलन कोण? मॅचनंतर कॅप्टन सूर्याने थेट घेतली दोघांची नावे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल