TRENDING:

भारताचा टी20 संघ ठरला, पण अजूनही टीममध्ये बदल होऊ शकतात, ICC चा नियम काय सांगतो?

Last Updated:
आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघातून शुभमन गिल आणि जितेश शर्माला बाहेर करण्यात आले आहे.
advertisement
1/6

2/6
दरम्यान वर्ल्ड कप सूरू व्हायला अद्याप 49 दिवस उरले असताना त्याआधी टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला आहे. पण जरी संघ जाहीर झाला असला तरी संघात अजूनही बदल होऊ शकतात.
advertisement
3/6
खरं तर टी20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सूरूवात होणार आहे.त्यामुळे 7 जानेवारीपर्यंत सर्व 20 संघांची घोषणा केली जाईल. पण त्यानंतरही संघात बदल शक्य आहेत. हे बदल आयसीसीच्या नियमानुसार होणार आहेत. त्यामुळे आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/6
कोणताही संघ टी20 वर्ल्ड कप सुरू होण्याच्या सात दिवस आधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) परवानगीशिवाय आपल्या संघात बदल करू शकतो.
advertisement
5/6
2023 च्या वनडे वर्ल्ड कपपुर्वी भारतीय संघाने हे केले. अक्षर पटेलची जागा रविचंद्रन अश्विनने घेतली. तसेच 2025चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाने जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल यांच्या जागी वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना घेतले.
advertisement
6/6
टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात कोणतेही बदल आयसीसी तांत्रिक समितीच्या मान्यतेच्या अधीन असतील. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल किंवा योग्य कारण असेल तरच समिती बदलांना मान्यता देईल. समितीची मान्यता मिळाल्यानंतरच बदली खेळाडू देखील संघात सामील होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
भारताचा टी20 संघ ठरला, पण अजूनही टीममध्ये बदल होऊ शकतात, ICC चा नियम काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल