Harmanpreet Kaur : जर्सीचा नंबर बदलला अन् नशीब चमकल, वर्षभरातच जिंकला वर्ल्ड कप! काय आहे अंकाचं सिक्रेट?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रविवारी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करून बाजी मारत साऊथ आफ्रिकेवर विजय मिळवला आणि ट्रॉफी भारताच्या नावे केली.
advertisement
1/7

रविवारी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करून बाजी मारत साऊथ आफ्रिकेवर विजय मिळवला आणि ट्रॉफी भारताच्या नावे केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मधील आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
advertisement
2/7
भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हनमनप्रीत कौरचं सर्वत्र कौतुक होत आहे. याचदरम्यान आता हरमनप्रीत कौरच्या जर्सी क्रमांकाची देखील चर्चा रंगली आहे.
advertisement
3/7
हरमनप्रीत कौर 84 नंबरची जर्सी घालायची. हरमनप्रीत कौरने ज्यावेळी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचा जर्सी क्रमांक 84 होता. हनमनप्रीत कौरने 1984 च्या दंगलीतील शहीदांच्या सन्मानार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ तिच्या आईने निवडलेला 84 क्रमांकाचा भारताच्या जर्सीसाठी क्रमांक निवडला होता.
advertisement
4/7
पण काही काळानंतर तिने जर्सीचा नंबर बदलला आणि 7 नंबरची जर्सी घालण्यास सुरुवात केली. हनमनप्रीत कौरने तिच्या पाठीवर 7 क्रमांक घातला आणि तो तिच्या आक्रमक शैलीचे, निर्भय नेतृत्वाचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनला.
advertisement
5/7
तथापि, नोव्हेंबर 2024 मध्ये, मुंबईत भारताच्या नवीन एकदिवसीय जर्सीच्या लाँचिंग दरम्यान, हरमनप्रीतने 7 ऐवजी 23 क्रमांक घातल्याने अनेकांना आश्चर्यचकित केले.
advertisement
6/7
प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ संजय बी जुमानी यांनी हरमनप्रीत कौरला 23 हा नंबर निवडण्याचा सल्ला दिला होता. 23 हा क्रमांक भाग्यवान ठरू शकतो असं हरमनप्रीत कौरला सांगण्यात आले.
advertisement
7/7
त्यानंतर हरमनप्रीत कौरने तिच्या एकदिवसीय जर्सी क्रमांक 7 वरून 23 वर बदलला आणि पुढच्याच वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याची चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Harmanpreet Kaur : जर्सीचा नंबर बदलला अन् नशीब चमकल, वर्षभरातच जिंकला वर्ल्ड कप! काय आहे अंकाचं सिक्रेट?