TRENDING:

T20 World Cup ला फक्त 41 दिवस शिल्लक, पण पाकिस्तानमध्ये वेगळाच तमाशा! बाबर आझमसह 4 स्टार खेळाडूंची संघातून हकालपट्टी

Last Updated:
T20 World Cup 2026 Pakistan Cricket : एकीकडे भारतात होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला 41 दिवस शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगळाच खेळ चालू असल्याचं पहायला मिळतंय. बाबर आझमची संघाच निवड केली नाही.
advertisement
1/7
T20 World Cup ला फक्त 41 दिवस शिल्लक, पण पाकिस्तानमध्ये वेगळाच तमाशा!
आगामी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या चार स्टार खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
2/7
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 सीरिजसाठी आपला संघ जाहीर केला असून, यामध्ये बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या स्टार खेळाडूंना डच्चू दिला आहे. त्याचं कारण देखील चकित करणारं आहे.
advertisement
3/7
2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वीची ही शेवटची महत्त्वाची सीरिज असूनही बोर्डाने मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत आता तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे.
advertisement
4/7
बाबर, शाहीन आणि रिझवान सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) खेळत आहेत. सुरुवातीला पीसीबी या लीगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास उत्सुक नव्हते, मात्र ऑक्टोबरमध्ये त्यांनी परवानगी दिली.
advertisement
5/7
बीबीएलचा हंगाम 25 जानेवारीपर्यंत चालणार असल्याने हे सर्व स्टार खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी अबू धाबी टी10 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या ख्वाजा नफे या युवा बॅटरला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
advertisement
6/7
7 ते 11 जानेवारी दरम्यान होणारी ही मॅच सीरिज वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेतच होणार असल्याने ही सीरिज पाकिस्तानसाठी 'वॉर्म-अप' मानली जात होती.
advertisement
7/7
दरम्यान, फखर जमान आणि नसीम शाह हे सध्या आयएलटी-20 (ILT20) लीगमध्ये खेळत असून, ती स्पर्धा संपल्यानंतर ते थेट श्रीलंकेत टीममध्ये सामील होतील. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप मोहिमेपूर्वी पाकिस्तानचा हा नवीन प्रयोग यशस्वी होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup ला फक्त 41 दिवस शिल्लक, पण पाकिस्तानमध्ये वेगळाच तमाशा! बाबर आझमसह 4 स्टार खेळाडूंची संघातून हकालपट्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल