TRENDING:

Pune News : व्हलेंटाईनच्या दिवशीच भयंकर घडलं, मित्रांशी गप्पा मारल्या अन् क्षणात सारं संपलं, ... हादरलं

Last Updated:

Pimpri-Chinchwad News : पिंपरी- चिंचवड शहरातून एका तरुणासंबंधित धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे त्यानं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं काही केलं ती सर्वच हादरले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. आकुर्डी परिसरातील गुरुद्वारा कॉलनी येथे 23 वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Young man found dead in rented room Maharashtra
Young man found dead in rented room Maharashtra
advertisement

जेवणावरून परतलेल्या मित्रांना बसला जबर धक्का

मृत तरुणाचे नाव समर्थ संजय माळी असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील होता. काही दिवसांपासून तो मित्रांसोबत आकुर्डीत वास्तव्यास होता. दुपारच्या वेळी त्याचे मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते. त्या दरम्यान तो खोलीत एकटाच होता. मित्र परत आल्यानंतर दरवाजा उघडला असता ही घटना उघडकीस आली.

मित्रांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नैराश्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : व्हलेंटाईनच्या दिवशीच भयंकर घडलं, मित्रांशी गप्पा मारल्या अन् क्षणात सारं संपलं, ... हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल