TRENDING:

Ajit Pawar : मेसेज पोहोचला, 32000 फुटावरून अजितदादा 1 मिनिट बोलले अन् फोन कट करताच घिरट्या घालून कोसळलं विमान, ऑडिओ क्लिप व्हायरल!

Last Updated:

Ajit Pawar Last Phone call : अजितदादांनी मेसेज पाहिला अन् त्यांनी लगेच फोन केला, असं श्रीजीत यांनी म्हटलं. अजित पवारांचा फोन कॉल आला 8:37 ला म्हणजेच मृत्यूच्या बरोबर 10 मिनिट आधी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajit Pawar Last Audio Clip : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गुढं काय? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न विचारले जातायेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नेते देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता अजित पवार यांची अखेरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
Ajit Pawar last call received 10 minutes before the plane crash
Ajit Pawar last call received 10 minutes before the plane crash
advertisement

अजितदादांना 8:19 मिनिटांनी मेसेज

काटेवाडीच्या श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्रीजीत पवार हे अजित पवार यांचे चुलत पुतणे आहेत. श्रीजीत पवार यांनी अजितदादांना 8:19 मिनिटांनी मेसेज केला होता, त्यावेळी ते विमानात होते. जेव्हा त्यांचं विमान मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये आला, त्यावेळी त्यांनी मेसेज पाहिला अन् त्यांनी लगेच फोन केला, असं श्रीजीत यांनी म्हटलं. अजित पवारांचा फोन कॉल आला 8:37 ला म्हणजेच मृत्यूच्या बरोबर 10 मिनिट आधी...

advertisement

अजितदादा एक मिनिटाच्या संवादात काय म्हटले?

अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्ष हा माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केला आहे. ही बँक केवढी आहे. तुम्हाला काही माहीत नसतं..आम्ही पण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो बाळा...

अखेरच्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले दादा?

advertisement

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता. त्यावर श्रीजीत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी, आम्ही सर्व जातीधर्माला बरोबरीने घेऊन जातो. सुप्यासह अनेक ठिकाणी माळी समाजाला आपण उमेदवारी दिली. ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली. इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही, असं अजित पवारांनी फोन कॉलमध्ये म्हटलं.

advertisement

बरोबर 3:37 ला फोन केला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, अजित पवार यांच्या डोक्यात जाती धर्माविषीय स्पष्ट संकल्पना असायच्या. त्यांनी सर्व जातीधर्माना न्याय दिला. अजितदादांनी बरोबर 8:37 ला फोन केला होता. कधीकधी विमानाच्या Wifi वर कॉल होतो, असंही श्रीजीत यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : मेसेज पोहोचला, 32000 फुटावरून अजितदादा 1 मिनिट बोलले अन् फोन कट करताच घिरट्या घालून कोसळलं विमान, ऑडिओ क्लिप व्हायरल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल