TRENDING:

आंदेकरांना तिकीट दिलं तर मी जाळून घेईल, आयुषच्या आईचा इशारा; स्वत:च्या तिकीटासाठी शिंदेसेनेकडे मुलाखत; फोटो व्हायरल

Last Updated:

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आता आगामी पुणे महानगरपालिका लढवणार आहे. फक्त बंडूच नाही तर त्याच्याच कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. पुण्यातील गँगवॉर हे शहराच्या गल्लीबोळापुरते मर्यादित राहिले नसून आता ते पुणे महानगपालिकेत दिसण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

पुण्यातील गँगवॉरमध्ये आता रक्ताचा हिशोब फक्त टोळ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो घराघरात, नात्यात पोचलाय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यात, त्यांच्या हत्येचा मारेकरी गणेश कोमकराच्या मुलाचा म्हणजेच आयुष कोमकरचा खून झाला. पण या घटनेला आणखी एक हृदय पिळवटून टाकणारा पैलू म्हणजे आता आयुषचा मारेकरी त्याचा आजोबाच निघाला आहे. आता या दोन कुटुंबातील रक्ताळलेला संघर्ष आता निवडणुकीच्या मैदानात पेटण्याची शक्यता आहे. गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिकेसाठी तिकिट मिळावे यासाठी मुलाखत दिली आहे.

advertisement

महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

गणपती विसर्जनादरम्यान आयुष कोमकरची हत्या ही वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूड मानली जाते. या गुन्ह्यात बंडू आंदेकरसह टोळीतील अनेक सदस्य सध्या गजाआड आहेत. मात्र, तुरुंगात असतानाही आंदेकर कुटुंबाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, कोर्टाकडून त्यांना निवडणूक लढवण्याची तांत्रिक परवानगीही मिळाली आहे. वनराज यांच्या पत्नी सोनाली आंदेकर या पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. ही बातमी समोर येताच कल्याणी कोमकर यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना तिकीट देऊ नका, अशी विनंती या व्हिडीओतून करण्यात आली आहे. तसेच कल्याणीने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

advertisement

कल्याणी कोमकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

एकीकडे कल्याणी कोमकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत दिली आहे. प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नारायण पेठमधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. 19 डिसेंबरला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिने मुलाखत दिली होती. यावेळी नीलम गोऱ्हे, रवींद्र धंगेकर यांनी घेतली कल्याणी हिची मुलाखत घेतली होती.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
आंदेकरांना तिकीट दिलं तर मी जाळून घेईल, आयुषच्या आईचा इशारा; स्वत:च्या तिकीटासाठी शिंदेसेनेकडे मुलाखत; फोटो व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल