युवतीच्या अपहरणाच्या घटनेनंतर भिगवणमध्ये संतप्त प्रक्रिया उमटल्या होत्या. हिंदूत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींनी अटक करण्याची मागणी केली. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं.
advertisement
सुनावणीत नेमकं काय घडलं?
आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली.
पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर जबाब फिरवला
मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीची सुधारगृहात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
वकील काय म्हणाले?
या प्रकरणी आम्ही फिर्यादी म्हणजे मुलीच्या आईच्या मार्फत वकीलपत्र दाखल करुन हजर झालो. त्यावेळेस मुलगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाली. कोर्टाने तिला तिची संमती विचारली असता तिने आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार कोर्टाने आई आणि मामा यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी सध्या सुधारणगृहात आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल त्यानंतर मुलगी आई आणि मामांकडे देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी सुनावणीनंतर दिली.
मुलीच्या आईने आणि भावाने काय आरोप केले?
पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. त या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले होते.
