TRENDING:

मुलींचं धर्मांतरण अन् 'मुंबई'पर्यंत सप्लाय! भोपाळच्या झोपडपट्टीतील अमरीन-आफरीनचा लग्झरी विला पाहून पोलीसही चक्रावले; धक्कादायक रॅकेट उघड

Last Updated:

काही काळापूर्वी भोपाळच्या अब्बास नगरमधील एका झोपडीत राहणाऱ्या या बहिणींनी या काळ्या धंद्यातून इतकी माया जमवली की, त्यांनी सागर रॉयल विलासारख्या पॉश भागात स्वतःचा आलिशान विला खरेदी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
भोपाळ: मध्य प्रदेश पोलिसांनी भोपाळमध्ये कामाचं आमिष दाखवून धर्मांतरण करण्यास भाग पाडणाऱ्या आणि सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना बेड्या ठोकल्या आहेत. या बहिणी मुलींचं धर्मांतरण करून त्यांना श्रीमंत ग्राहकांसाठी गुजरात आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 'सप्लाय' करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
अमरीन-आफरीनचं धर्मांतरणाचं रॅकेट
अमरीन-आफरीनचं धर्मांतरणाचं रॅकेट
advertisement

झोपडीतून आलिशान विलापर्यंतचा प्रवास

अमरीन आणि आफरीन अशी अटक करण्यात आलेल्या बहिणींची नावं आहेत. काही काळापूर्वी भोपाळच्या अब्बास नगरमधील एका झोपडीत राहणाऱ्या या बहिणींनी या काळ्या धंद्यातून इतकी माया जमवली की, त्यांनी सागर रॉयल विलासारख्या पॉश भागात स्वतःचा आलिशान विला खरेदी केला. अत्यंत महागडी जीवनशैली जगणाऱ्या या बहिणी गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होत्या.

advertisement

असा उघड झाला प्रकार

छत्तीसगड आणि भोपाळमधील दोन पीडित मुलींनी धाडस दाखवून पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. या मुलींनी दिलेल्या माहितीनुसार: सुरुवातीला मदतीच्या नावाने किंवा घरकामासाठी मुलींना बोलावलं जायचं. त्यांना हाय-प्रोफाईल जीवनशैलीची स्वप्नं दाखवून मोठ्या पार्ट्यांमध्ये नेलं जायचं. तिथे रईसजाद्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलींवर दबाव आणला जायचा. तसंच त्यांना दारू आणि एमडी (MD) सारखे ड्रग्ज घेण्यास भाग पाडलं जायचं.

advertisement

धर्मांतरणाचा 'खेळ'

या प्रकरणातील तिसरा आरोपी चंदन यादव याने स्वतः इस्लाम स्वीकारला होता. तो पीडित मुलींना "मुस्लिम व्हा, मी तुमची चांगली लग्न लावून देतो" असं आमिष दाखवायचा. एका पीडितेनं सांगितलं की, चंदनने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला बुरखा घालण्यासाठी आणि नमाज पठण करण्यासाठी सक्ती करण्यात आली.

मुलींची मुंबई-गुजरातला रवानगी

advertisement

अमरीनच्या मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुप्स आढळले आहेत, ज्यात मुलींचे फोटो आणि व्यवहार केल्याचे चॅट्स आहेत. या मुलींना महिन्याला १० हजार रुपये देऊन गुजरात आणि मुंबईला पाठवले जात असे. तिथे त्यांचे शोषण केले जात होते.

पोलिसांची कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
परदेशी पाहुण्यांना भेटा अन् बक्षीस मिळवा, संभीजनगरकरांसाठी पर्वणी, कधी आणि कुठं?
सर्व पहा

पोलिसांनी अमरीन, आफरीन आणि चंदन यादव यांना अटक केली असून बिलाल, चानू आणि यासिर या तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितांनी सांगितलं की, तक्रार केल्यास त्यांना जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मुलींचं धर्मांतरण अन् 'मुंबई'पर्यंत सप्लाय! भोपाळच्या झोपडपट्टीतील अमरीन-आफरीनचा लग्झरी विला पाहून पोलीसही चक्रावले; धक्कादायक रॅकेट उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल