TRENDING:

परदेशी पाहुण्यांना भेटा अन् बक्षीस मिळवा, छ. संभीजनगरकरांसाठी पर्वणी, पाहा कधी आणि कुठं? Video

Last Updated:

Bird Festival: पक्षी महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या पक्षांचे निरीक्षण त्यासोबत विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील निसर्ग आणि पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमी (इरफा) यांच्या वतीने 11 व्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात 22 फेब्रुवारीपासून झाली असून 1 मार्चपर्यंत हा महोत्सव साजरा होईल. पक्षी महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या पक्षांचे निरीक्षण त्यासोबत विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
advertisement

‎एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन, इको सत्व आणि वन विभाग या तीनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा होत आहे. ‎सोनेवाडी (जायकवाडी) येथे पक्षी निरीक्षण होईल, त्यानंतर एमआयटी कॉलेजमध्ये पर्यावरण अभ्यासकांसाठी पर्यावरणावर आधारित चित्रपट प्रदर्शन होईल. 26 फेब्रुवारी रोजी 'स्टोरी टेलिंग' पीईएस कॉलेजच्या परिसरात हा नेचर वॉक पर्यावरण प्रेमींसोबत होईल. त्यासोबतच 26 फेब्रुवारी रोजी लहान मुलांसाठी 'स्टोरी टेलिंग' हा कार्यक्रम होईल. 5 ते 9 वयोगटातील मुलांसाठी खाम इको पार्कमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येईल. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये पर्यावरण, पक्षी तज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.

advertisement

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या या शाळेत नवा मुख्यमंत्री, कायं घडतंय? Video

‎फोटोग्राफी स्पर्धा एमआयटी कॉलेजमध्ये होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 'ऑन द स्पॉट फोटोग्राफी कॉम्पिटीशन' घेतली जाणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी विजयपूर येथे ही स्पर्धा होईल. 1 मार्च रोजी खाम इको पार्क येथे पक्षी महोत्सवाचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 7 ते 11 या वेळेत 'बायो ब्लिट्झ बर्ड रेस' कार्यक्रम होईल, तर दुपारी शालेय मुलांसाठी पक्षी महोत्सवांतर्गत घेण्यात येत असलेल्या 'मी पक्षी बोलतोय' या ऑनलाईन स्पर्धेचे पारितोषिक वितरण खाम इको पार्क येथे केले जाईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अपघातात भाऊ गमावला अन् बदललं जगण्याचं मिशन, अभिनेत्याच्या भावाचं मोठं काम, Video
सर्व पहा

या पक्षी महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी आणि पक्षी प्रेमींनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 72768 95919 या नंबरवर कुणाल यांच्याशी संपर्क साधावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
परदेशी पाहुण्यांना भेटा अन् बक्षीस मिळवा, छ. संभीजनगरकरांसाठी पर्वणी, पाहा कधी आणि कुठं? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल