पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबतच्या वक्तव्यामुळे भाजप आणि राज्यातील हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने थेट पुण्यातील काँग्रेस भवनवर मोर्चा काढत निषेध झाला. आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ, दगडफेकीचा देखील प्रयत्न झाला. यामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान आंदोलना दरम्यानचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास दीड ते दोन तास आंदोलन केलं. आंदोलकांकडून यावेळी घोषणा बाजी आणि दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काँग्रेसचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते, त्यातील एका कार्यकर्त्यांना दगड लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी महिला पोलिसांसह काही कारला देखील दगड लागल्याचं दिसून आलं, या सर्व राड्यानंतर आणि काँग्रेस कार्यकर्त्याचं डोकं फुटताच भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनासमोरुन काढता पाय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनात भाजपाचा एक कार्यकर्ता काँग्रेस भवनाच्या दिशेने दगड फेकताना दिसत आहे. पोलीस त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांचा विरोध झूगारत या कार्यकर्त्याने हा दगड फेकल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. आंदोलनाच्यावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
पुण्याच्या महापौरांविरोधात तक्रार दाखल
काँग्रेसकडून फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपूरे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांच्या विरोधात काँग्रेसने केली तक्रार दाखल केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, दुष्यंत मोहोळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी तसेच उद्या आम्ही काँग्रेस पक्षाची एक बैठक घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवू .जर गुन्हा दाखल करून यांना अटक नाही झाली तर आम्ही यांच्यापेक्षाही मोठ आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे.
पाहा Video
पुण्यात सकाळपासून काय घडलं?
- हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानानंतर सकाळी दहा वाजता पतीत पावन संघटने कडून काँग्रेस पक्ष करायला बाहेर मोठे आंदोलन करण्यात आलं.
- या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला फासत त्यांचे बॅनर जाळण्यात आले
- त्यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील दुपारी साडेबारा वाजता काँग्रेस भावना बाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता
- काँग्रेस भवनला मोठा पोलीस बंदोबस्त पोलिसांकडून ठेवण्यात आला होता
- काँग्रेस भवनला पोलिसांकडून छावणीचे स्वरूप देण्यात आलं होतं याच दरम्यान भाजपने काँग्रेस भावना बाहेर हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली
- तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेस भवन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भगतसिंह कोशारी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं
- या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येत जोरदार घोषणाबाजी करत होते
- पण याच आंदोलनाला पुढे जाऊन गालबोट लागलेलं पाहायला मिळालं
- कारण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेकीचा प्रयत्न झाला
- आणि याच दगडफेकीदरम्यान दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेले पाहायला मिळाले
- या सगळ्याला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला
- तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांचा मुळे हा सगळा गोंधळ झाला आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करत पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस पक्षाने ठिय्या आंदोलन केलं
काँग्रेस कार्यकर्ते देखील भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतो. पोलिस देखील मोठ्या संख्येने काँग्रेस भवन बाहेर उभे होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा टिपू सूलतानच्या वेशातील फोटो झळकावत घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.
