कोणत्या वेळेत पूल सूरु ठेवण्याची होत आहे मागणी?
पुणे शहरातील सजग नागरिक मंचने या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मेट्रोचे काम दिवसा थांबवून भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि पादचारी पुलाचे काम रात्रीच्या वेळी करावे. या मागणीसाठी मंचचे अध्यक्ष वितेक वेलणकर यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे.
advertisement
गणपती उत्सवादरम्यान मेट्रोचे काम 15 दिवस थांबवून भिडे पूल तात्पुरता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर 9 सप्टेंबरपासून पूल पुन्हा महिनाभरासाठी बंद करण्यात आला. मेट्रोला दिलेली मुदत 10 ऑक्टोबरला संपली असली तरी काम अद्याप सुरू आहे.
दरम्यान दिवाळीच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी भिडे पूल सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता, तर रात्री मेट्रोचे काम सुरू राहिले. आता हीच पद्धत कायम ठेवावी म्हणजे दिवसा पूल खुला आणि रात्री काम सुरू ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल आणि मेट्रोचे कामही थांबणार नाही असा नागरिकांचा विश्वास आहे.
