TRENDING:

मध्य रेल्वे सुसाट! पुणे-मुंबई-दक्षिण भारताचा प्रवास होणार वेगवान; दौंडमधील 157 कोटींच्या 'मेगा प्रोजेक्ट'बद्दल अपडेट

Last Updated:

आतापर्यंत रेल्वे इंजिनच्या मोठ्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी पुणे विभागाला इतर केंद्रांवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, या नवीन लोको शेडमुळे इंजिनची तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल आता दौंडमध्येच स्थानिक पातळीवर होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड जंक्शन आता भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचं नवं केंद्र बनलं आहे. सुमारे १५७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक 'इलेक्ट्रिक लोको शेड'चं काम 95 टक्के पूर्ण झालं असून, लवकरच ते पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ रेल्वेचा वेग वाढणार नाही, तर महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.
मध्य रेल्वे सुसाट (फाईल फोटो)
मध्य रेल्वे सुसाट (फाईल फोटो)
advertisement

आता दौंडमध्येच होणार इंजिनची 'ओव्हरहॉलिंग'

आतापर्यंत रेल्वे इंजिनच्या मोठ्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी पुणे विभागाला इतर केंद्रांवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, या नवीन लोको शेडमुळे इंजिनची तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल आता दौंडमध्येच स्थानिक पातळीवर होणार आहे. यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीनं दुरुस्ती शक्य होईल आणि रेल्वे गाड्यांचा खोळंबा कमी होऊन त्यांचा वेग वाढण्यास मदत होईल.

advertisement

इंजिनच्या चाकांची अचूक तपासणी करण्यासाठी ५ कोटी रुपये किमतीची 'पिट व्हील लेथ' मशिन बसवण्यात आली आहे. बंद पडलेली इंजिन ओढण्यासाठी बॅटरीवर चालणारे विशेष वाहन उपलब्ध करण्यात आले आहे, जे रस्ता आणि रेल्वे रूळ अशा दोन्ही ठिकाणी धावू शकते. सध्या या शेडमध्ये ५० इलेक्ट्रिक इंजिनची व्यवस्था असून, भविष्यात ही क्षमता २०० इंजिनपर्यंत वाढवली जाणार आहे.

advertisement

मालवाहतुकीला मिळणार 'बूस्टर'

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल, सिमेंट आणि कोळशाच्या वाहतुकीसाठी दौंड हे महत्त्वाचं जंक्शन आहे. मालगाड्यांना वेळेवर सुसज्ज इंजिन उपलब्ध झाल्यामुळे उद्योग आणि शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

"दौंड लोको शेडमुळे इलेक्ट्रिक इंजिनच्या देखभालीची क्षमता वाढणार आहे. याचा थेट परिणाम रेल्वे गाड्यांच्या वेगावर आणि कार्यक्षमतेवर होईल."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
सर्व पहा

— हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मध्य रेल्वे सुसाट! पुणे-मुंबई-दक्षिण भारताचा प्रवास होणार वेगवान; दौंडमधील 157 कोटींच्या 'मेगा प्रोजेक्ट'बद्दल अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल