मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी
ही समस्या लक्षात घेऊन पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र राखीव डबा देण्याची मागणी केली आहे. यासाठी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. तसेच डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्सप्रेसमध्ये नियमित तिकीट तपासणी व्हावी यासाठी सह्यांची मोहीमही राबवण्यात आली.
advertisement
संघटनेच्या म्हणण्यानुसार पुणे-मुंबई मार्गावरील या गाड्या हजारो नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी जीवनवाहिनी आहेत. मात्र, कोरोना काळानंतर डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. सिंहगड एक्सप्रेसचे पूर्वी 19 डबे होते ते सध्या 14 वर आले आहेत. त्यामुळे अनारक्षित प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एकच जनरल डबा असल्याने प्रवाशांना उभे राहायलाही जागा मिळत नाही.
महिलांची सुरक्षितता आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी स्वतंत्र महिला डबा आणि किमान तीन जनरल डबे पुन्हा जोडावेत अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
