TRENDING:

Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर यांचे आणखी 7 प्रताप; यादीच आली समोर, पोलिसांनाही बसला धक्का!

Last Updated:

बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीनं देखील कारवाई केली आहे. दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचं नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आला आहे. पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला आहे. पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत असल्यानं आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पूजा खेडकर यांनी जेव्हा पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांनी आपलं नाव खेडकर पूजा दिलीपराव असं लिहीलं होतं. दुसऱ्यावेळेला त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख पूजा दिलीप खेडकर असा केला. तर काही ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा देखील आढळून आला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर यांचे आणखी 7 प्रताप; यादीच आली समोर, पोलिसांनाही बसला धक्का!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल