TRENDING:

पुणे हादरलं! शेजाऱ्याच्या घरातून येत होते आवाज; खिडकीतून डोकवताच स्वतःच्याच 7 वर्षाच्या लेकीला त्या अवस्थेत पाहून आई सुन्न

Last Updated:

आरोपीची मजल इतकी वाढली की, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(गोविंद वाकडे, प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड: मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात एका नराधमाने एका चिमुकलीवर अत्याचार केला. आपल्या शेजारीच राहणाऱ्या सात वर्षांच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रामु कुंजल निसाद (वय ४०) या नराधमाला एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. आरोपी रामु निसाद याने पीडित मुलीला फूस लावून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने चिमुरडीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

आरोपीची मजल इतकी वाढली की, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा केला आणि तात्काळ पोलीस ठाणे गाठले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी रामु निसाद याला तातडीने अटक केली आहे. त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! शेजाऱ्याच्या घरातून येत होते आवाज; खिडकीतून डोकवताच स्वतःच्याच 7 वर्षाच्या लेकीला त्या अवस्थेत पाहून आई सुन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल