मानसी असं आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. सुसाइड नोटमध्ये तरुणीनं आत्महत्येचं कारणही सांगितलं आहे. "मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही" असं म्हणत त्या तरुणीने जीवन संपवलं आहे. तसेच आपण स्वत:हून हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असंही तिने नोटमध्ये म्हटलं आहे. बुधवार पेठेत अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
सुसाईड नोटमध्ये नक्की काय म्हटलं?
तरुणीने आत्महत्या करणापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं की, "मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे." मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मागील काही काळापासून याच इमारतीत वास्तव्याला होती. गुरुवारी सायंकाळी अचानक तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.
या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं. दरम्यान या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत असून सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
