पुण्यातल्या सगळ्यात श्रीमंत लक्ष्मी रोडवर असणाऱ्या शगुन चौकात भाजपचे हे कार्यकर्ते जमले. यात अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुणे शहरातले भाजपचे सगळे मुख्य नेते उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदी नामाचा जप करत जीएसटीमधील सुधारणेचा आनंद साजरा केला.
राज्यातील काही जिल्ह्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जीएसटीच्या धोरणांमध्ये बदल केल्याबद्दल पुण्यातील लक्ष्मी रोड वरील शगुन चौकात "आनंदोत्सव" या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी "धन्यवाद, मोदी सरकार" अशा घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी माध्यम प्रतिनिधी यांनी राज्यातील पूरस्थिती असताना या "आनंदोत्सव" बद्दल प्रश्न विचारला असता "हा आनंदोत्सव नव्हे तर जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही आलो असल्याचं" भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर दिलं. विशेष म्हणजे भाजपच्या शहर माध्यम समन्वयक यांच्याकडून या "आनंदोत्सव" चा आमंत्रणाचा निरोप दिवसातून ३ वेळा अनेकांपर्यंत पोहचला होता.
advertisement