नियम मोडल्यास 'ऑटोमॅटिक' कारवाई
नवले पुलाचा तीव्र उतार आणि जड वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने या मार्गावरील वेगमर्यादेत मोठी कपात केली आहे. यापूर्वी ६० किमी प्रतितास असलेली वेगमर्यादा आता ४० किमी प्रतितास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्यांद्वारे आपोआप दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
advertisement
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
रंबल स्ट्रिप्स: कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत वाहनांचा वेग नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी २० मिमी उंचीचे रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आले आहेत.
डिजिटल डिस्प्ले बोर्ड: वाहनचालकांना हवामान, रस्ता आणि वाहतुकीची ताजी माहिती देण्यासाठी ३ नवीन डिजिटल बोर्ड लावले जात आहेत.
सुरक्षा चिन्हे: मार्गावर रिफ्लेक्टिव्ह कॅट-आइज, लेन मार्किंग, ब्लिंकर्स आणि धोक्याचे इशारा फलक लावून रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे.
"नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी आम्ही तत्काळ प्रतिसाद प्रणालीवर भर दिला आहे. कॅमेरे पोलीस यंत्रणेशी जोडल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २४ तास नजर ठेवणे आता शक्य झाले आहे." - संजय कदम, प्रकल्प संचालक, NHAI, पुणे.
