TRENDING:

Pune : घराचा उंबरठा ओलांडला तो शेवटचाच, कुटुंबाचा लाडका सिद्धार्थ हरपला; परिसरात हळहळ

Last Updated:

Accident News : पुण्यातून एका अपघाताची बातमी समोर आलेली आहे. जिथे लालपरीमुळे घराचा एक आधार पुर्णपणे हरपला आहे. नेमका अपघात कसा घडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोणीकंद परिसरात घडलेली आहे. ही दुर्घटना अहिल्यानगर रस्त्यावर झाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ST bus accident in Lonikand Pune today
ST bus accident in Lonikand Pune today
advertisement

हसत्या-खेळत्या कांबळे कुटुंबावर काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार एसटी बसने जोरदार धडक दिल्याने सिद्धार्थ एकनाथ कांबळे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

या प्रकरणी साविताराम कोंडीबा कांबळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रा दाखल केली आहे. पोलिसांनी एसटी बस चालक अशोक नामदेव खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अपघात नेमका कसा झाला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : घराचा उंबरठा ओलांडला तो शेवटचाच, कुटुंबाचा लाडका सिद्धार्थ हरपला; परिसरात हळहळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल