TRENDING:

पिंपरीत सिंहासनासाठी काँटे की टक्कर! भाजप आणि राष्ट्रवादीची धाकधूक वाढवणारा Exit Poll पोल; कोण ठरणार किंगमेकर

Last Updated:

पिंपरीत सत्तेचा मार्ग भाजप किंवा राष्ट्रवादीची धाकधूक वाढवणारा ठरणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी पिंपरीत भाजप हा मोठा पक्ष ठरण्याच अंदाज वर्तवला आहे. मात्र असे असले तरी सत्तेचा मार्ग हा भाजपसाठी म्हणावा तितका सोपा नसल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे.
News18
News18
advertisement

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या PRAB Exit Pollमधून दोन्ही महापालिकांतील संभाव्य सत्तासमीकरण स्पष्ट होताना दिसत आहे. या अंदाजानुसार, भाजप (BJP) शहरांत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण 32 प्रभागांपैकी महापालिकेच्या 17 प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत वाढली आहे. त्या ठिकाणी काँटे की टक्कर होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. सर्वच पक्षीयांनी 128 जागांवर उमेदवार दिले आहेत

advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष?

PRAB Exit Poll नुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NPC) 51 जागा मिळू शकतात. शिवसेनेलाही काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड : संभाव्य जागावाटप (PRAB Exit Poll):

  • BJP : 64
  • NPC : 53
  • advertisement

  • Congress : 1
  • Shiv Sena : 9
  • Others : 0

या आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आघाड्यांची गरज भासू शकते.

पिंपरीत फोडाफोडीचे राजकारण

एक्झिट पोलमध्ये आलेल्या आकडे पाहता जरी भाजप मोठा पक्ष ठरला तरी अजित पवार इथे गणिते बिघडवण्याची शक्यता आहे. पिंपरीत राष्ट्रवादीला सत्ता मिळण्यासाठी अवघ्या 11 जागांची गरज आहे. त्यामुळे पिंपरीत फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांनी पुण्याची निवडणूक विशेष गाजली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. पण अजित पवार यांच्या प्रचार सभांनी पुण्यात रंगत आणली

advertisement

अंतिम निकालाकडे लक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि तुरीच्या दरात पुन्हा घट, कापसाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

PRAB Exit Poll हे अंदाज असले तरी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत या आकडेवारीतून मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत या अंदाजांची कितपत पुष्टी होते, याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पिंपरीत सिंहासनासाठी काँटे की टक्कर! भाजप आणि राष्ट्रवादीची धाकधूक वाढवणारा Exit Poll पोल; कोण ठरणार किंगमेकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल