TRENDING:

पुण्यातील नामांकित कॉलेजजवळ देहविक्री रॅकेट, लॉजवर सुरू होता धक्कादायक प्रकार, 4 तरुणींची सुटका

Last Updated:

पुण्याच्या नऱ्हेगाव भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका नामांकित कॉलेजजवळ सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यासह आसपासच्या भागात विविध गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या चंदननगर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलं होतं. आता पुण्याच्या नऱ्हेगाव भागात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका नामांकित कॉलेजजवळ सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या चार तरुणींची सुटका केली आहे.
pune news
pune news
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी शहरातील अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने नऱ्हेगाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी 4 तरुणींची सुटका केली असून 3 पुरुष आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती की नऱ्हेगाव येथील झील कॉलेजवळील “स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खात्री करून पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर अचानक छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक दिलीप गवळी (वय २४, रा. खेड शिवापूर), रामू सांडू देवकर (वय २४, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि महेश गणेश नागने (वय ३४, रा. न-हे गाव, पुणे) या तिघांना अटक केली आहे. या तिघांवर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा नऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील नामांकित कॉलेजजवळ देहविक्री रॅकेट, लॉजवर सुरू होता धक्कादायक प्रकार, 4 तरुणींची सुटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल